Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकप्रेमी अब्दुल्ला घराणे !

संपादकीय
     स्वतःचा पुत्र हा आपल्यापेक्षा अधिक सरस किंवा यशस्वी झाल्यावर पिता हर्षोल्हासित होणे स्वाभाविक आहे. तसेच काहीसे फारूख अब्दुल्ला यांच्याबाबतीत झाले असेल. पाकप्रेमाच्या बाबतीत फारूख अब्दुल्ला यांना त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी मागे टाकले आहे. तसे अब्दुल्ला घराणे हे पाकप्रेमी घराणे ! शेख अब्दुल्ला यांच्या काळापासून पाकप्रेमाची परंपरा ही त्यांचे वारसदार पुढे चालू ठेवत आहेत. अब्दुल्ला घराण्याकडे आता काश्मीरची सत्ता नाही. त्यामुळे पिता-पुत्रांकडे वेळच वेळ असून तो वेळ ते पाकची भाटगिरी करण्यात घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी फारूख अब्दुल्ला यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या बापाचा नाही’, असे विधान केले होते. आता ओमर अब्दुल्ला हे ‘बापसे बेटा सवाई’ असल्यामुळे त्यांनी ‘काश्मीरमधील अशांततेला केवळ पाक उत्तरदायी नाही’, असे सांगत भारतावर प्रहार केला आहे. फारूख किंवा ओमर अब्दुल्ला यांनी अशी दर्पोक्ती करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी अशा प्रकारे विखारी वक्तव्ये केली आहेत. बुरहान वानी याला ठार मारल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी हळहळ व्यक्त केली होती. एवढेच काय त्याला ‘तरुणांचा आदर्श’ संबोधून ‘सन्मानीत’ केले होते. ओमर अब्दुल्ला यांना काश्मीर ही राजकीय समस्या वाटते. त्यामुळे त्याच्यावर राजकीय उपाययोजना हवी, असेही त्यांचे मत आहे. अब्दुल्ला घराण्याला भारताने मोठे केले; मात्र या घराण्याची निष्ठा सतत पाकसमवेत राहिली. येथे प्रश्‍न हा आहे की, अशा पाकनिष्ठांवर कारवाई का होत नाही ? काश्मीर समस्येविषयी बरेच काही बोलले जाते; मात्र त्याविषयी अजूनही उपाययोजना काढण्यात एकाही शासनकर्त्याला यश आलेले नाही. काश्मीरमधील अब्दुल्लासारखी घराणी आणि फुटीरतावादी हे पाकला बळ पुरवतात. अशा राजकीय लोकांमुळेच भारताला वेठीस धरण्याचे दुःसाहस पाक करतांना दिसतो. त्यामुळे काश्मीरची समस्या सोडवायची असेल, तर प्रथम काश्मीरमधील ही पाकप्रेमी केंद्रे ‘खालसा’ करणे आवश्यक आहे. अब्दुल्ला पिता-पुत्र असे अधूनमधून गरळओक करत असतात. त्यानंतर सत्तेत असणारे पक्ष आणि काही राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या विरोधात टीका-टिप्पणी करतात आणि नंतर प्रकरण थंड होते. सत्ताधार्‍यांनी मात्र आता या पाकनिष्ठांच्या विरोधात कृतीशील होणे आवश्यक आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचा नाही’, असे सांगणार्‍यांना तो भारतियांच्या पूर्वजांचा कसा आहे, हे भारत शासनाने कृतीतून दाखवावे ! पाकवर चढाई करून त्याला धडा शिकवल्यास भारतातील त्याच्या म्होरक्यांची तोंडे आपोआप बंद होतील !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn