Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाजप राष्ट्रभक्त पक्ष असल्याने त्याला मुसलमान मतदान करत नाहीत ! - भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांचा दावा

     बागपत (उत्तरप्रदेश) - मुसलमानांनी भाजपला कधी मतदान केलेले नाही आणि ते करणारही नाहीत. भाजप हा राष्ट्रभक्त पक्ष असल्याने मुसलमान मतदान करत नाहीत, असे विधान भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले. राममंदिर निश्‍चितच बनणार असून त्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रवेश वर्मा यांनी या विधानाच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी केली आहे. स्वतःच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यामुळे वर्मा यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मुसलमान समाज भाजपला मतदान करत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोे.
     केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता त्यांनी मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाही, असे सांगत उत्तर देण्याचे टाळले. भाजप एक राष्ट्रभक्त राजकीय पक्ष असून सर्वांना साथ घेऊन जाण्यावर विश्‍वास ठेवतो. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे, असे नक्वी म्हणाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn