Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वाराणसी येथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता आणि अन्य धर्माभिमान्यांकडून प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन !

ख्रिस्ती नववर्षाच्या नावाखाली ३१ डिसेंबरला होत 
असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांची मोहीम
वाराणसी येथील पोलीस अधीक्षक (ग्रामीण)
आशीष तिवारी यांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू
     वाराणसी - ३१ डिसेंबरला नववर्ष साजरा करण्याच्या नावावर लोकांकडून हिंदु संस्कृतीचे होणारे हनन; सार्वजनिक आणि प्रेक्षणीय स्थळे तसेच तीर्थक्षेत्रे या ठिकाणी करण्यात येत असलेल्या अयोग्य कृती यांना प्रतिबंध करण्यात यावा, यासाठी येथील हिंदु धर्माभिमान्यांनी आयुक्त ओमप्रकाश चौबे, अप्पर जिल्हा दंडाधिकारी जे.एम्. सिंह आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आशीष तिवारी यांना निवेदन दिले. या सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी शिष्टमंडळाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अरुण कुमार मौर्या, अधिवक्ता धर्मेंद्र सिंह, अधिवक्ता रोहनलाल भारद्वाज, अधिवक्ता रवी श्रीवास्तव, अधिवक्ता अवीन राय, अधिवक्ता जैकी शुक्ल, अधिवक्ता विनोद पाण्डेय; तसेच शीवपूर, वाराणसी येथील धर्माभिमानी श्री. राकेश गुप्ता आणि श्री. पवन गुप्ता अन् सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे : ‘युपी न्युज’ आणि ‘के टिव्ही’ या वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनी हिंदु जनजागृती समिती आणि अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्याशी संवाद साधला (बाईट घेतली).
वकिली व्यवसायाला प्राधान्य न देता राष्ट्र आणि धर्म 
कार्यासाठी वेळ देणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी !
     अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अशील त्यांची प्रतिक्षा करत असतांना अधिवक्ता त्रिपाठी यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला प्राधान्य दिले आणि पूर्णवेळ उपक्रमात सहभागी झाले. यासाठी त्यांनी त्यांच्या इतर अधिवक्ता सहकार्‍यांनाही निमंत्रित करून त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेतले. (अधिवक्ता त्रिपाठी यांचे अभिनंदन ! राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आपला अमूल्य वेळ देणारे अधिवक्ता त्रिपाठी यांच्यासारखे हिंदुत्वनिष्ठच सनातन धर्माची खरी शक्ती होत ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn