Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीकडून अधिवक्त्यांची बैठक

      जळगाव - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शहरातील अधिवक्त्यांची बैठक जळगावातील आचार्य कॉम्प्लेक्स येथे १९ डिसेंबर या दिवशी घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, राष्ट्र उभारणीच्या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. समाज विघातक गोष्टी थांबवून समाज बळकट होण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हिंदु विधीज्ञ परिषदेद्वारे अनेक धर्माभिमानी अधिवक्ते राष्ट्र आणि धर्मजागृतीच्या या कार्यात सक्रीयपणे सहभागी आहेत. त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र मंदिरातील घोटाळा, तुळजापूर, पंढरपूर येथील मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस आणून धर्मकार्यात सहभाग घेतला आहे. याचप्रमाणे जिल्ह्यातील अधिवक्त्यांनीही अशाप्रकारे सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन केल्यानंतर उपस्थित अधिवक्त्यांनी उर्त्स्फूतपणे आम्ही या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. त्यानंतर एरंडोल, धरणगाव, जळगाव येथील बार काउन्सिलमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे, हा ठराव संमत करण्यात येईल आणि प्रतिमास एकदा एक बैठक राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी घेणार यावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला जिल्हा बार काउन्सिलचे सचिव श्री. गोविंद तिवारी, तसेच धर्माभिमानी अधिवक्ते श्री. योगेश पाटील, श्री. संजयसिंग पाटील, श्री. भाटिया, श्री. कैलास परदेशी यांच्यासह अन्य अधिवक्ते उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn