Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबईतील ‘राम मंदिर’ रेल्वेस्थानकासाठी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे योगदान !

श्री. गजानन कीर्तीकर
संसदेत आवाज उठवून शेवटपर्यंत केला पाठपुरावा !
      मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - जोगेश्‍वरी ते गोरेगाव रेल्वेमार्गामध्ये बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वेस्थानकाला ‘राम मंदिर’ नाव द्यावे, यासाठी शिवसेनेचे खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांनी १५ डिसेंबर २०१५ या दिवशी ‘जनतेचे महत्त्वाचे विषय’ या सत्रात संसदेत आवाज उठवला होता. ‘वीर सेना’, तसेच स्थानिक नागरिकांची ही मागणी श्री. गजानन कीर्तीकर यांनी संसदेत मांडून या विषयाला बळकटी दिली आणि विविध पत्रांद्वारे शेवटपर्यंत या विषयाचा पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन अखेर २५ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाने या रेल्वेस्थानकाला ‘राम मंदिर’ असे नाव देण्याविषयीचे अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवले आहे.       खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रशासनाकडून हा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे आणि योग्य पडताळणीनंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सकारात्मकरीत्या गेला. नगरविकास विभागाचे परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांच्या संमतीनंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर राज्याच्या गृहविभागाने या रेल्वेस्थानकाला ‘राम मंदिर’, असे नाव देण्याचे घोषित केले.
     खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या मतदारसंघात येणार्‍या या रेल्वेस्थानकाच्या नावासाठी संसदेत आवाज उठवतांना त्यांनी खालील सूत्रे उपस्थित केली.
१. ओशिवरा रेल्वेस्थानकाचे भूमीपूजन झाले, त्या वेळी या विभागाचा मी आमदार होतो. त्या दिवसापासून आजमितीपर्यंत सातत्याने ओशिवरा रेल्वेस्थानक कार्यान्वित होण्यासाठी आणि या रेल्वेस्थानकाला ‘राम मंदिर’, असे नामकरण करावे, यासाठी मी १४ डिसेंबर २०१५ पासून प्रयत्नशील आहे.
२. वर्ष १८७२ मध्ये या ठिकाणी बांधण्यात आलेल्या राममंदिरामुळे तेव्हापासून आजपर्यंत हा परिसर ‘राम मंदिर’ या नावाने ओळखला जातो.
३. मुंबई महानगरपालिकेने रेल्वे क्रॉसिंग ते स्वामी विवेकानंद रोड या रस्त्यालासुद्धा ‘राम मंदिर रस्ता’, असे नामकरण केले आहे.
४. येथील बेस्टच्या आगाराचे नावही ‘राम मंदिर रोड बस आगार’, असेच आहे.
५. या परिसरातील नागरी औद्योगिक वसाहतीमधील वीज आणि पाणी यांची देयकेही या ठिकाणाचा उल्लेख ‘राम मंदिर रोड’ असा उल्लेख करून पाठवली जातात.
६. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या दप्तरीसुद्धा ‘राम मंदिर रोड’, अशीच नोंद आहे.
७. याविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना मी १४ डिसेंबर २०१५ या दिवशी या रेल्वेस्थानकाचे नाव ‘राम मंदिर रोड रेल्वेस्थानक’, असे द्यावे, यासाठी निवेदन दिले आहे.
८. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी नामरकरणाचा प्रस्ताव गृहविभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांनीदेखील १५ डिसेंबर २०१५ या दिवशी स्वत: हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना सादर केला.
९. या विषयाचा पाठपुरावा व्हावा यासाठी मी २ एप्रिल २०१६ या दिवशी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने निवेदन सादर केले.
१०. या रेल्वेस्थानकाचे नाव ‘राम मंदिर रोड’ देण्यात यावे, यासाठी तत्कालीन नगरसेवक, आमदार श्री. सुनील प्रभु यांनी २ मे २०१६ या दिवशी संमतीसाठी हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केला. महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव संमत होऊन महापौर सौ. स्नेहल आंबेकर यांनी यासाठी पाठपुरावा करावा, असा ठराव संमत करण्यात आला.
११. महापौर सौ. स्नेहल आंबेकर यांनी याविषयी १ जून २०१६ या दिवशी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभु, तर २० जून २०१६ या दिवशी केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांना निवेदन दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn