Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई, ठाणे, पालघर येथे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ३१ डिसेंबरला होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात प्रबोधन मोहीम
     मुंबई, २१ डिसेंबर (वार्ता.) - देशभरात सध्या पाश्‍चात्त्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या ऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या वेळी मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन, महिलांवरील अत्याचार आदी अपप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. या कुप्रथांमुळे युवापिढीचे नैतिकदृष्ट्या हनन होत आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली होणारे हे अपप्रकार रोखावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल आदी ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्म प्रेमी नागरिकांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, शौर्य प्रतिष्ठान आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक
शंकर जाधव यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी
पनवेलच्या तहसीलदार कल्याणी कदम
यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी
  • मुंबई : येथे भायखळा, काळाचौकी, भोईवाडा, चुनाभट्टी, दादर, वरळी, कांजूरमार्ग, शिवाजी पार्क या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी शौर्य प्रतिष्ठानचे श्री. सागर मोरे, धर्माभिमानी सर्वश्री विनोद प्रजापति, रोशन पवार, शंकर, अनिल नाईक, नीलेश पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन घाग आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विवेक भोईर, गणेश दुखंडे, प्रसाद मानकर, संदीप सकपाळ उपस्थित होते.
  • पालघर : या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना सनातन संस्थेच्या सौ. जयश्री अहिरराव आणि श्रीमती कीर्ती वाघ यांनी निवेदन दिले.
  • पनवेल : पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आणि तहसीलदार कल्याणी कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वैशाली पुंडले, सौ. सुनंदा व्हावळ, श्री. विलास पुंडले, श्री. सुरेश व्हावळ हे उपस्थित होते.
  • अमरावती : ख्रिस्ती नववर्षोत्सवानिमित्त ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार थांबवावेत, यासाठी येथील पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नीलेश टवलारे, सौ. स्मिता ठाकरे, श्री. श्याम सांगूनवेढे, श्री. योगेश भागवतकर, श्री. संजय चौधरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, आम्ही या वेळी विनाअनुमती कोणतेही कार्यक्रम चालू देणार नाही. तुम्हाला कोठेही अपप्रकार होतांना आढळल्यास तुम्ही आम्हाला सांगा. अन्य वेळीही हिंदुत्वनिष्ठांना चुकीचे काही जाणवल्यास ते आम्हाला सांगू शकतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn