Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवाची ओढ असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पाळधी, जि. जळगाव येथील चि. गीतेश महेंद्र चौधरी (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गीतेश चौधरी एक दैवी बालक आहे !
चि. गीतेश चौधरी
      मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (६.१२.२०१६) या दिवशी पाळधी येथील चि. गीतेश महेंद्र चौधरी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची वैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. गीतेश चौधरी याला सनातन परिवाराच्या
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद ! 
१. जन्मापूर्वी 
१ अ. सात्त्विक जीव जन्माला यावा, यासाठी प्रार्थना करणे : मी श्रीकृष्णाला ‘जन्माला येणारा जीव सात्त्विक, साधना करणारा आणि देव, राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करणारा असू दे’, अशी प्रार्थना करायचे.
१ आ. स्वप्नात पू. जाधवकाका दिसणेे : मला गर्भधारणा झाल्यानंतर दुसर्‍या मासात (महिन्यात) सतत ३ - ४ दिवस स्वप्नात टिळा लावलेले आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा सदरा घातलेले
पू. जाधवकाका दिसले आणि ते मला आश्रमात यायला सांगत असल्याचे जाणवले. जळगाव आश्रमात ‘यज्ञ चालू आहे’, असे दिसले.
१ इ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि प.पू. डॉक्टरांंचे भ्रमणभाषवर मार्गदर्शन लावल्यावर गर्भाची हालचाल वाढून तो प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे : गर्भधारणेच्या ५ व्या मासात (महिन्यात) प.पू. डॉक्टर आणि पू. पेठेआजी यांचे भ्रमणभाषवर मार्गदर्शन लावल्यानंतर, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यानंतर गर्भाची हालचाल वाढून तो प्रतिसाद देत असल्याचे जाणवायचे; मात्र भ्रमणभाष बंद केल्यानंतर गर्भाची हालचाल थांबायची.’ 
- सौ. चैताली चौधरी (गीतेशची आई) 
१ उ. ‘या काळात वहिनीची आध्यात्मिक उपाय करण्याची ओढ वाढली होती आणि तिच्या तोंडवळ्यावरील तेजही वाढले होते.’ - श्री. शेखर चौधरी (गीतेशचे काका) 
१ ऊ. आईच्या स्वभावात पालट होणे 
१. ‘गर्भधारणा झाल्यानंतर माझी अनेक गोष्टींंतील आसक्ती न्यून झाली, तसेच माझा चिडचिडेपणा न्यून झाल्याचे जाणवले.’ 
- सौ. चैताली चौधरी 
२. ‘या काळात वहिनीचा स्वभाव अधिक नम्र आणि प्रेमळ झाला होता.
३. वहिनी गरोदर असतांना मला ‘तिच्या पोटी सात्त्विक बाळ जन्माला येईल’, असे वाटायचे.
४. घरच्या वातावरणातील जडपणा अल्प झाला होता.’ 
- श्री. शेखर चौधरी 
५. ‘वहिनी गरोदर असतांना त्यांना मायेतील बोलण्यापेक्षा साधनेविषयी बोलायला आवडायचे.
६. ‘साधक आणि पू. जाधवकाका यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळायचे, ते त्यांना सांगावे’, असे मला आतून वाटायचे. तेव्हा त्या मार्गदर्शन पूर्णपणे ऐकून घ्यायच्या.’ 
- सौ. मनीषा चौधरी (गीतेशची आत्या)
१ ए. रुग्णालयात गेल्यावर नामजप आणि प्रार्थना यांत वाढ होणे अन् प.पू. डॉक्टर खोलीत आल्याचे जाणवणे : ‘मला प्रसूतीवेदना चालू झाल्यावर आम्ही सकाळी रुग्णालयात गेलो. आधुनिक वैद्यांनी ‘१२ वाजेपर्यंत बाळाचा जन्म होईल’, असे सांगितले. त्या वेळी माझा नामजप, प्रार्थना आणि उपाय यांत वाढ झाली. मी रामरक्षा स्तोत्र म्हणत होते, तसेच खोलीत उदबत्ती लावली होती. मला प.पू. डॉक्टर खोलीत आले असून ते ‘खोलीतील वातावरण प्रसन्न वाटत आहे’, असे म्हणाल्याचे जाणवले.’ - सौ. चैताली चौधरी 
२. जन्मानंतर
२ अ. ‘बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला प्रथम पाहिल्यावर मला त्याच्यात प.पू. गुरुदेवांचे प्रतिबिंब दिसले.’ - श्री. शेखर चौधरी
२ इ. वय ८ मास ते १ वर्ष 
२ इ १. सनातन पंचांग पाहून आनंदाने उड्या मारणे : ‘आमच्या घराच्या मुख्य दारासमोर सनातन पंचांग लावले आहे. ते पंचांग पाहून गीतेशला आनंद होतो. ते पाहून तो आनंदाने उड्या मारतो. 
२ इ २. देवाची ओढ असणे
अ. घरात आरती करत असतांना आरतीचा आवाज ऐकून आणि निरांजनाकडे पाहून गीतेश आनंदी होऊन उड्या मारतो.’ 
- श्री. शेखर चौधरी 
आ. सनातन पंचांगातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र यांवरून तो हात फिरवतो. तो त्यांना नमस्कार करतो.’ 
- श्री. महेंद्र चौधरी (गीतेशचे वडील)
इ. ‘गीतेशला उभा करून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप चालू केल्यावर तो आनंदाने नाचतो. त्या वेळी ‘त्याला जपातून शक्ती मिळते’, असे जाणवते आणि माझा भाव जागृत होतो.’ - सौ. मनीषा चौधरी 
३. रामाचा पाळणा आणि भजन ऐकल्यावरच झोपी जाणे, 
स्वतः उपाय करणे आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणे 
      ‘गीतेश प्रतिदिन रात्री रामाचा पाळणा आणि भजन ऐकवल्यावरच झोपतो. आम्ही प्रतिदिन रात्री कापराचे उपाय करतो. तेव्हा गीतेश लगेच दोन्ही हात पुढे करून कापूर मागून घेतो आणि स्वतःवर उपाय करतो. त्यातील थोडासा कापूर तो आपली आजी आणि बाबा यांना देतो अन् त्यांनाही उपाय करण्याची खूण करतो. तो अत्तराची बाटली घेऊन स्वतःच हात आणि कपडे यांना अत्तर लावतो आणि त्याचा सुगंधही घेतो. 
४. देवघराजवळ बसून ॐ चा उच्चार करणे आणि घरातील सर्वांना नमस्कार करणे
     गीतेश भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना ‘बाबाजी’ असे संबोधून देवाला नमस्कार करतो. तो देवघराजवळ बसून ॐ चा उच्चार करतो. त्यानंतर घरातील मोठ्यांना पायावर डोके ठेवून किंवा हाताने नमस्कार करतो. तो प्रत्येकाला प्रेमाने हाक मारतो. 
५. भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या 
छायाचित्रांकडे बघून त्यांना आसनावर बसण्याची विनंती करणे 
     त्याच्या घरी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांची मोठी छायाचित्रे आहेत. गीतेश त्या छायाचित्रांकडे पाहून आसनावर हात ठेवतो आणि त्यांना ‘या, बसा’, ‘खीची (खुर्ची) घ्या, पाणी प्या’, असे नेहमी म्हणत असतो.
६. जन्मापासूनच घर आणि घरातील लोक यांच्यात अनेक पालट जाणवणे
      गीतेशचा जन्म झाल्यापासून घरात आणि घरातील लोकांमध्ये अनेक पालट झालेले जाणवले. तो बोबड्या आवाजात घरातील सर्वांची विचारणा करतो. त्याच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्याच्यातील या गुणांमुळे त्याला सांभाळण्यास घरातील कोणीही कंटाळा करत नाहीत. ‘त्याला सतत खेळवत रहावे’, असे वाटते.’ 
- श्री. महेंद्र चौधरी (बाबा) आणि सौ. चैताली चौधरी (आई), जळगाव
४. गीतेशचे स्वभावदोष 
अ. ‘हट्टीपणा
आ. स्वतःला आवडणारी वस्तू इतरांना न देणे’ 
- सौ. चैताली चौधरी
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn