Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय सर्वश्रेष्ठ आहे ! - श्री. गोपाल दास, ज्येष्ठ नेते, विहिंप

डावीकडून सर्वश्री तुषार कांती दास,
चित्तरंजन सुराल, गोपाल दास,
डॉ. हरिचरण दास आणि बोलतांना श्री. सुमंत देवनाथ
      बिलासीपाडा (आसाम), १४ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे ध्येय आणि विचार स्पष्ट आहेत. माझ्या संपूर्ण जीवनात मी अशी संघटना पाहिली नाही. समिती जात, भाषा किंवा प्रांत यांमध्ये कधीच भेद करत नाही. त्यामुळे समितीसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा उद्देश नक्कीच यशस्वी होईल, असे आशीर्वादपर उद्गार विश्‍व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ नेते श्री. गोपाल दास यांनी येथे काढले.
      आसामच्या बिलासीपाडा येथे अमर क्लब सभागृहात हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक हिंदु युवक यांनी एकत्र येऊन ‘हिंदूसंघटन संमेलन’ कार्यक्रमाचे आयोजन केेले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला स्थानिक हिंदुत्वनिष्ठ, तसेच विविध हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ता श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी उपस्थितांना संमेलनाचा उद्देश सांगितला. कोलकाता येथील सनातन संस्थेचे साधक श्री. सुमंत देवनाथ यांनी सनातन संस्था, संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि हिंदु जनजागृती समितीचा उपस्थितांना परिचय करून दिला. त्यानंतर श्री. रतन पाल यांनी स्थानिक हिंदूंच्या समस्यांची माहिती दिली.
       आसामच्या अरण्य सुरक्षा समितीचे सचिव डॉ. हरिचरण दास म्हणाले की, वर्तमानकाळात हिंदूंच्या समोर ज्या समस्या आहेत, त्या प्रतिदिन वाढत आहेत. याच्यावर एकमेव उपाय म्हणजे सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होणे.
      हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि उत्तर-पूर्व भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना हेच आपले लक्ष्य आहे, यासाठीच आपल्याला धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी लोकांचे संघटन करायचे आहे. सध्या हिंदु समाजामध्ये धर्मशिक्षणाचा आत्यंतिक अभाव आहे. जर आपण आपला धर्मच नीट समजलो नाही, तर धर्मकार्य कसे करणार ? यासाठीच आपल्याला धर्मशिक्षण घ्यायला हवे.’’
      स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. हंसराज सेठिया यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास येथील ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी श्री. तुषार कांती दास, भोजपुरी समाजाचे सभापती श्री. काशीप्रसाद शॉ आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. गोपाल दास यांनी समितीचे कार्य पाहिल्यावर आणि समजून घेतल्यानंतर ते कृतज्ञताभावाने समितीच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत होते.
      श्री. हंसराज सेठिया (वय ७४ वर्षे) यांनी उत्साहाने कार्यक्रमाचे नियोजन, भोजन, खुर्ची-टेबल मांडणे आदी सेवा केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn