Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे देहाची शुद्धी होत असल्याची अनुभूती घेणारे रोमानिया येथील श्री. द्रगोस बार्बलता !

    महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या
शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती 
श्री. द्रगोस बार्बलता
श्री. द्रगोस बार्बलता हे रोमानिया येथून आले आहेत. गेल्या ८ वर्षांपासून ते साधना करत आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून साधना केली आहे. त्यांना ‘मानसिक तणावाच्या माध्यमातून स्वतःला आध्यात्मिक त्रास आहे’, असे वाटते. काही काळापूर्वी त्यांनी स्वतःचे घर विकले, चाकरी सोडली आणि ते पर्वतांच्या ठिकाणी वास्तव्यास गेले. तेथे राहून त्यांना खरा साधनामार्ग शोधायचा होता आणि ‘पुढे काय करायचे आहे’, याचे ध्येय निश्‍चित करायचे होते. त्याच उद्देशाने ते या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिले. त्यांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.
स्वतःला असलेले आध्यात्मिक त्रास, आश्रमातील सात्त्विकता
आणि चैतन्य यांमुळे नामजप करतांना एकाग्रता साधणे कठीण जाणे
    ‘रामनाथी आश्रमात मला पुष्कळ चांगले आणि आरामदायी वाटत आहे. मला जे शिकायला आणि अनुभवायला मिळत आहे, त्याविषयी मी पुष्कळ कृतज्ञ आहे. माझ्या संदर्भात चमत्कारिक गोष्ट घडत आहे. आश्रमात नामजप करतांना आणि ध्यान लावतांना माझी एकाग्रता अल्प होत होती. एकाग्रता साधणे मला पुष्कळ कठीण जात होते. पहिल्या दिवशी मी नामजपाच्या खोलीत नामजपासाठी एक घंटा बसलो. तेव्हा मला पुष्कळ आनंद जाणवला आणि मला तिथे प्रचंड प्रमाणात चांगली शक्ती जाणवली. मात्र माझी एकाग्रता न्यून होत होती. माझ्यासाठी हा एक विरोधाभास होता आणि ‘हे काय होत आहे’, हे मला कळत नव्हते. नंतर मला जाणवले, ‘मला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे असे होत होते. त्याचबरोबर आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे माझ्या देहाची शुद्धी होत होती.’’
- श्री. द्रगोस बार्बलता, रोमानिया
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn