वाजपेयी यांच्या काळात इंडिया शायनिंगची घोषणा देण्यात येऊनही पक्ष पराभूत झाला. नरसिंह राव यांनी आर्थिक सुधारणेद्वारे देशाचा विकासदर वाढवूनही त्यांचा पराभव झाला. राजीव गांधी यांनी औद्योगिक क्षेत्रात प्रगती घडवून आणल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. मोरारजी देसाई यांनीही आर्थिक सुधारणा केल्या, तरीही त्यांचा पराभव झाला. म्हणजेच विकासामुळे विजय मिळत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. - खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप