Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवद आश्रमातील साधकांचे भाग्य थोर, लाभले प.पू. पांडे महाराज ।

प.पू. पांडे महाराज 
गुरूंप्रती (टीप १) असे अपार श्रद्धा, व्यक्त करती त्यांच्याप्रती पदोपदी कृतज्ञता ।
ज्यांनी सोपवले मला साक्षात् अवतार स्वरूप भगवंताच्या (परात्पर गुरु डॉक्टर) हाती ।
सांगती कधी आठवणी गुरुंविषयी
होतसे आपली भावजागृती ॥ १ ॥

प.पू. बाबा करत असती २४ घंटे गुणगान ।
परात्पर गुरु डॉक्टरांचेविना नाही रमत त्यांचे मन ।
प्रत्येक क्षणी हृदयी त्यांच्या असतात परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण ॥ २ ॥
ध्यास होता प.पू. प्रमाणे देवद आश्रमातील साधकांना पुढे नेण्याचा ।
अफाट प्रीती त्यांची आश्रमातील साधकांवर ।
दिवस रात्र ध्यास एक प्रगती व्हावी साधकांची साधनेत ॥ ३ ॥

प्रीती त्यांची निर्मळ झर्‍यापरी ।
लक्ष असती आश्रमातील साधकांवरी । 
तळमळ असे त्यांची अपार या वयातही ॥ ४ ॥

शिकण्याची वृत्ती त्यांची अपार ।
सतत शिकत असती संत आणि साधक यांकडून । 
त्यांच्याकडे वहातसे अफाट ज्ञानाचा महासागर ॥ ५ ॥

साधकांना कधी होत असला त्रास ।
कधीही तत्पर देण्यासाठी मंत्रोपाय ।
मार्गदर्शन करती साधकांना शिकण्यास ॥ ६ ॥

घडविती साधकांना ते आपल्या कृतीतून ।
आश्रमात फिरतांना प.पू. बाबा आनंद होतसे प्रत्येक वस्तूस ।
प.पू. बाबांच्या खोलीतून पसरते आश्रमात चैतन्याची लाट ॥ ७ ॥

देवद आश्रमातील साधकांचे भाग्य थोर ।
आश्रमातील साधकांना लाभले प.पू. पांडे महाराज ।
दिसतसे त्यांना भगवंत प्रत्येक कणाकणात ॥ ८ ॥

उणे पडतो आम्ही साधक फार त्यांच्याकडून घेण्यास आत्मज्ञान ।
करीतो प्रार्थना ईश्‍वर चरणी आज ।
उदंड आयुष्य लाभो त्यांना ईश्‍वरी राज्याची पहाट पहाण्या ॥ ९ ॥

सत्य कधी न लपते तयांच्याकडे ।
मनीचेे कळते सर्व अन् साधकांच्या मनातील सोडवती ते कोडे ।
साधकांना ते प्रत्येक अडचणीतून सोडवणे हाच असे त्यांचा समष्टी ध्यास ।
करती सतत सर्व जगभरातल्या साधकांसाठी नामजप अन् प्रार्थना ॥ १० ॥

असे त्यांच्यामध्ये तळमळ अन् चिकाटी । 
शब्दाशब्दांत त्यांच्या भरले आहे ज्ञान ।
सुरवातीपासून व्यवहारातही केली त्यांनी प्रत्येक कृती साधना म्हणून ।
लाभले थोर गुरु प.पू. बापूराव महाराज ।
गुरुकृपा संपादन करूनी संसार करत गाठले त्यांनी संतपद ॥ ११ ॥

आदर्श ठेवला मोठा त्यांनी संसारातही कसा करायचा परमार्थ ।
परि त्यांनी ओळखले मनी हाच आहे खरा गुरुमंत्र ।
तो नेणार या कलियुगात सर्व साधकांस मोक्षास ॥ १२ ॥

विचार न करता त्यांनी त्यागिले सर्व ।
आले पूर्णवेळ आश्रमात करण्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती ।
केले त्यांनी साधकांचे त्रास अन् संकटे संस्थेवरची दूर ॥ १३ ॥

करती साधकांसाठी नामजप आणि उपाय ।
सिद्ध आहेत ते या आप्तकाळातही साधकांचे रक्षण करण्यास ।
साधकांवर करती प्रेम झेलून स्वत: त्रास ।
कितीतरी करत असती दिवस रात्र परि ।
कर्तेपण अर्पण करती भगवंता चरणी ॥ १४ ॥

असेल ते सनातनच्या इतिहासात ।
मुलास त्यांच्या शिकवतांना गणित आेंकारातून ।
लिहिला ग्रंथ त्यांनी श्रीगणेश अध्यात्म दर्शन ॥ १५ ॥

भावभक्ती त्यांची फार श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉक्टरांप्रती ।
शब्दच नाही या जगती या भक्तीची तुलना करण्यास ।
प्रकट झाले त्यांच्यातील देवत्व ॥ १६ ॥

आपण सारे साधक आहोत भाग्यवंत ।
किती कृतज्ञता व्यक्त करू भगवंत चरणांस ।
सांगत असती सतत साधक संत गोप-गोपी यांस ।
प.पू. आहेत साक्षात् श्रीकृष्ण ॥ १७ ॥

सर्वांना सतत पटवून देत असती ।
खरा भगवंत कोण आहे ओळखले आहे त्यांनी ।
महर्षिही म्हणती अवतार घेतला श्रीविष्णूने प.पू. डॉक्टरांच्या रूपात ॥ १८ ॥

कधी उणीव भासू दिली नाही आम्हा ।
झाले आमचे मायबाप ।
भरून काढली परात्पर गुरु डॉक्टरांची उणीव ।
दिसते आम्हा त्यांच्यातच गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर ॥ १९ ॥

नोकरी करतांना व्यवहारात ।
घोर अरण्यात राहून केली साधना ऋषीमुनींप्रमाणे ।
घेतली साधनेत गरुडझेप हेच त्यांचे वैशिष्ट्य ॥ २० ॥

किती व्यक्त करू परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता ।
थोर गुरु लाभले प.पू. पांडे महाराज ।
यामुळे आम्ही अनुभवतो प्रत्येक क्षण आनंदात ॥ २१ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती भावभक्ती अपार ।
ध्यास त्यांना असे सतत स्वप्न परात्पर गुरु डॉक्टरांचे करण्या पूर्ण ।
हिंदु राष्ट्राची करण्या स्थापना ॥ २२ ॥

मी काय करू आणखी म्हणजे येईल लवकर ईश्‍वरी राज्याची पहाट ।
परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले कृतीतून अमूल्य धर्मशास्त्र ।
प.पू. बाबांनी सांगितले त्याचे विश्‍लेषण करून शास्त्र ॥ २३ ॥

कितीही लिहिले प.पू. बाबांवरती ।
न पुरते आम्हा साधकांशी शब्द, शाई अन् कागद ।
मीच उणी पडते त्यांच्या सेवेसी ।
संधी दिली त्यांनी भली मोठी मला त्यांच्या सेवेसी ॥ २४ ॥

शरण जाऊन प्रार्थना करते परात्पर गुरु डॉक्टरांसी अन् प.पू. बाबांसी ।
अहं स्वभावदोष नष्ट करून माझे ।
आशीर्वादरूपी भाव भक्तीची भीक घाला माझ्या पदरी ।
कोटी कोटी कृतज्ञ असे मी त्यांच्या चरणी ॥ २५ ॥

पाहुनी त्यांचे ज्ञान भारावून जातात साधक ।
भरला आहे खजिना ज्ञानाचा त्यांच्याकडे ।
उभा करतील इतिहास पुन्हा एकदा ।
देऊन तक्षशीला अन् नालंदा विद्यापीठ जनास ॥ २६ ॥

त्यांना वाटते सनातनचा साधक म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचा साधक ।
आपण चुकलो समाजासमोर ।
नाव ठेवले जाईल परात्पर गुरु डॉक्टरांना समाजात ।
साधका सांगती सदैव प्रत्येक कृती करावी आदर्श ॥ २७ ॥

रहा सतर्क म्हणजे गुरूंचा आशीर्वाद मिळेल तुम्हास ।
साधनेत रहाल तुम्ही प्रगतीपथावर ।
सनातनच्या कृपाछत्रातील प्रगती होते साधकांची ।
आनंद होतो अपरंपार त्यांना मनी ॥ २८ ॥

ते आम्हास सांगती, साधनेसाठी तुम्ही सोडले घरदार ।
पण खरे करायचे आहे सर्मपण ।
गुरुचरणाशी कसे रहायचे अनुसंधानात ।
भाव अन् भक्ती वाढवण्यास ॥ २९ ॥

प.पू. बाबा, परात्पर गुरु डॉक्टर, काही चुकल्यास क्षमा करा या जिवाला ।
प्रयत्न करीन तुम्हाला अपेक्षित असे घडण्यासी ।
कृपाशीर्वाद सदैव असू द्या ।
अखंड आम्हा साधकांवरती, अखंड आम्हा साधकांवरती ॥ ३० ॥

- कु. सविता भणगे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
टीप १ - परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती 
        जीवेत् शरदः शतम् । म्हणजे शंभर वर्षे आयुष्य लाभो प.पू. बाबांना उदंड आयुष्य लाभून आम्हा साधकांवर त्यांचे कृपाछत्र सतत राहू दे, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो. - देवद आश्रमातील सर्व साधक (२२.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn