Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कु. सुुप्रिया नवरंगे यांच्या वाढदिवसाला कु. दीपाली पवार यांनी शुभेच्छापत्र देऊन दिलेला कृष्णानंद !

कु. सुप्रिया नवरंगे यांना दिलेले शुभेच्छापत्र
कु. सुप्रिया नवरंगे
लखोट्यावर असलेले लिखाण
      सुप्रिया, वाढदिवसाच्या निमित्ताने तुला माझ्याकडून पुष्कळ आशीर्वाद आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत तुझ्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगले प्रयत्न होऊ देत, यासाठीही तुला आशीर्वाद ! - तुझा कृष्ण
कृष्णासमवेत जाण्यासाठी आतुरलेली आमची लाडकी ताई कु. सुप्रिया नवरंगे !
कृष्णाचे कु. सुप्रियाला आश्‍वासन
कृष्ण : सुप्रिया मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला तुला शाश्‍वती दिली होती की, तुला गरुड वाहनात माझ्यासमवेत घेऊन जाणार आहे म्हणून ! ती शाश्‍वती खरी आहेेे; पण त्यासाठी भाव, तळमळ, परिपूर्णता या प्रगतीसाठी आवश्यक घटकांची तुझ्यात वाढ करणे आवश्यक आहे. हे घटक वाढवण्यासाठी जसजसे प्रयत्न करशील, तसतसे तुला माझ्या अस्तिवाच्या आणि माझ्या चिरंतन आनंदाच्या अनुभूती येतील. प्रयत्न करतांना विचारप्रक्रियेमुळे अज्ञान दूर होऊन आपल्यात ज्ञानाची वृद्धी होते. त्याप्रमाणे तूही प्रयत्नातून शिकशील. मग प्रयत्न करशील ना ?
(कु. सुप्रियाताई काहीच बोलत नाही. ती केवळ कृष्णाकडे पहात रहाते.)
कृष्णाच्या गोपी कु. सुुप्रियाताईभोवती तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देऊन कु. सुुप्रियाताईभोवती
फेर धरून आनंद साजरा करतांनाचे दृश्य
      कृष्णाच्या गोपी फेर धरून आनंद व्यक्त करत आहेत.
भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पूर्णपणे शरण गेलेली,
कु. सुप्रियाताई, कृष्णाच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार करतांनाचे दृश्य !
सुप्रियाताई : कृष्णा, मी तुझ्या चरणी संपूर्णपणे शरण आले आहे रे ! कृष्णा, माझे तीव्र त्रास, तीव्र प्रारब्ध या सर्वांवर मात करून मी माझ्यात भाव, तळमळ आणि परिपूर्णता हे गुण कसे आत्मसात करू, ते सांग ना कृष्णा ! कृष्णा, तू सर्वशक्तीमान, सर्वज्ञ, दयाळू आणि कृपाळू आहेस. माझ्यावर कृपा कर कृष्णा ! तूच घडव या सुप्रियाला. मी तुझ्या चरणी शरण आले आहे !
     मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजेच १३.१२.२०१४ या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे वाढदिवस साजरा करून कु. सुुप्रियाताईला आनंद दिला आणि पुढील साधनेसाठीही भरभरून आशीर्वादही दिला.
     कु. सुुप्रियाताईची प्रगती जलद गतीने होवो, हीच कृष्णचरणी प्रार्थना ! - कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०१४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn