Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विविध आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेल्या आणि ‘ज्यांच्याकडून सर्वांनीच शिकावे’, असा चैतन्याचा स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ
१. सहजता 
    ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सगळ्यांना शिकण्याचा एक स्रोत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगळे अस्तित्व जपत नाहीत. त्या सहजतेने सगळ्यांमध्ये मिसळून जातात. 
२. प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करून 
स्वतःच्या आचरणातून इतरांना शिकवणे 
    सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करून सर्व कृती सहजतेने करतात. त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला, तेव्हापासून त्यांचा हा गुण पहायला आणि शिकायला मिळाला. प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण
सौ. रंजना गडेकर
करण्यास शिकणार्‍या आणि इतरांनाही ते आत्मसात करण्यास शिकवणार्‍या त्याच आहेत. या कृतींचे पैलू आपल्या आचरणातून इतरांना शिकवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्या वेळी अनेक संतांनी त्यांना ज्या ज्या सेवा सांगितल्या, त्या त्यांनी शिकून घेतल्या होत्या. आरंभी त्यांनी आश्रमात शूद्र वर्णाची सेवाही केली आहे. 
३. चतुर, सतर्क, संवेदनशील आणि तत्पर 
    त्या चतुरही आहेत. त्या एकाच कार्यपद्धतीत कार्यरत न रहाता प्रत्येक गोष्टीत तन्मयता ठेवतात. त्या कार्य करतांना मनाच्या स्तरावर पुष्कळ सतर्क आणि संवेदनशील असून तत्पर असतात. सर्वकाही करूनही त्या वर्तमानात असतात. त्यांच्यासह सेवा करतांना सर्वांनाच आनंद मिळतो. त्या आपुलकीने सर्वांची काळजी घेतात. त्या प.पू. डॉक्टरांच्या सात्त्विकतेचा लाभ करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना अपेक्षित असे त्यांचे आचरण असते.
४. निर्मळ मन आणि सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याची तळमळ 
     त्यांचे मन मोकळे आणि निर्मळ आहेे. त्यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यांच्या मनाची निर्मळता त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवते. तेथे ईश्‍वरी अनुसंधान असल्यामुळे त्या विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांतून जाणून घेऊन (ईश्‍वरी संकेतानुसार) कार्य करू शकतात. त्यांना सर्व जण समान आहेत. त्यांना सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याची तळमळ असते. त्यांना जी काही माहिती झालेली असते, ती साधकांना आणि समष्टीला सांगून तिचा आस्वाद घेण्यास दिल्यावरच त्यांना शांती मिळते. 
५. सर्वांशीच वेगवेगळ्या नात्यांनी जोडल्या जाणे 
     त्या ऋषिकन्या आहेत. त्या काहींच्या ताई आहेत, तर काहींच्या माई, आई, काकू आणि सखी आहेत. त्या आदर्श शिष्य आणि सर्वांच्या गुरुही आहेत. 
६. त्यांच्या तोंडवळ्यावर उमटणार्‍या प्रतिक्रिया या तात्कालिक असतात, तसाच तो भाव समष्टीच्या कल्याणासाठीच असतो. 
७. ‘आश्रम आणि गुरु यांच्याप्रती भाव कसा असायला हवा ?’, 
याचे आदर्श उदाहरण म्हणजे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ! 
     ‘आश्रम आणि गुरु यांच्याप्रती भाव कसा असायला हवा ?’, याचे त्या आदर्श उदाहरण आहेत. त्यांचे प्रसंगांकडे पहाण्याचे दृष्टीकोन हे मानसिक स्तरावरचे नसून त्या संदर्भात त्या सर्वांना आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. त्यांनी सहजतेने काही बोललेलेही इतरांच्या मनावर बिंबते.
८. साधकांना घडवणे 
     दौर्‍याच्या कालावधीत त्यांच्यासमवेत असलेल्या साधकांमध्येही आता जाणवणारा पालट हा त्यांच्यामुळेच आहे. ‘त्याच त्यांना घडवत आहेत’, असे वाटते.
९. इतर गुण 
       त्यांच्यातील अन्य गुणांव्यतिरिक्त अहं अल्प असणे, सगळ्यांना सहजतेने सामावून घेणे, क्षमाशीलता, प्रीती ही त्यांची ज्ञात झालेली काही वैशिष्ट्ये आहेत.
      त्यांच्याविषयी जाणण्याची माझी क्षमता नाही; परंतु जे काही देवाने सुचवले, त्यांच्याविषयी अनुभवले, ते लिहिण्याचा प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या चरणी अर्पण करत आहे.
१०. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या खोलीविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे 
अ. २०.१.२०१६ या दिवशी आश्रमातील त्यांच्या खोलीकडे पाहिल्यावर त्यांची खोली प्रकाशमान दिसली.
आ. खोलीच्या दाराभोवती पारदर्शक चंदेरी कड असलेली प्रभावळ दिसली. 
इ. दार मध्येच पारदर्शक दिसत होते, जणूकाही त्यांच्या खोलीला दारच नाही.’
(त्यांच्याविषयी लिखाणास आरंभ केल्यावर मला पुष्कळ उत्साह वाटला आणि आलेली मरगळही दूर झाली.)
- सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१६) 
सनातनची अंजली : सद्गुरु (सौ.) अंजलीताई
     ‘मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०१६) या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजलीताईंचा वाढदिवस झाला; पण त्यांची आठवण परवापासूनच येत होती. संगणकावर बसल्या बसल्या गुरुमाऊलीने हे शब्द सुचवले. ते सद्गुरु (सौ.) अंजलीताईंच्या चरणी अर्पण करते.’ 
ऐसी सनातनची अंजली (टीप १) 
रहातसे सदा भरून । 
ही आहे श्रीकृष्णाची थाळी 
जशी देई भरभरून ॥ १ ॥

किती विचारा ज्ञान येते तिज सगळीकडून । 
देतो देव तिला उणे न पडे कधी त्यातून ॥ २ ॥

घ्या तिची परीक्षा उतरे ती समरस होऊन । 
चिंता ना तिला संसाराची नुरली 
ना त्या मायेची ॥ ३ ॥

ताई, किती वंदू तुम्हाला कळेना 
या वेड्या मायेला । कारण ते वंदन जाती 
परात्पर गुरूंच्या चरणांना ॥ ४ ॥

मिळाले संतांचे आशिष तुम्हाला ।
मी वेडी काय देऊ तुम्हाला ॥ ५ ॥ 

पण येई आठव मायेची, उब तुमच्या शालीला । 
शाल आहे शालीनतेची, 
तीच पुरवी ज्ञान सनातनला ॥ ६ ॥

शालीतच आहे उब, 
प्रेम ते सनातन हिंदु राष्ट्राचे । 
शिकवले त्यांनीच परि पाहे, 
परात्पर गुरु कौतुक भरल्या नजरेने ॥ ७ ॥

टीप १ - आेंजळ आणि सद्गुरु (सौ.) अंजलीताई 
       सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना कृतानेक साष्टांग नमस्कार ! 
एक वेडी भाविक 
- रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०१६, सकाळी ११.२०) 
    या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn