Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळा पैसा पांढरा केल्याच्या आरोपाखाली ‘अ‍ॅक्सिस’ बँकेच्या २ व्यवस्थापकांना अटक!

देशातील प्रमुख बँकांमधील अधिकारीच 
काळा पैसा पांढरा करण्यात गुंतले असतील, तर 
सरकारची भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोहीम यशस्वी होईल का ? 
     नवी देहली - काळा पैसा सोन्याच्या रूपात पालटून दिल्याच्या आरोपाखाली ‘अ‍ॅक्सिस’ बँकेच्या शोभित सिन्हा आणि विनीत गुप्ता या दोन व्यवस्थापकांना सक्तवसूली संचालनलयाने (ईडी) अटक केली आहे. राजीव सिंह नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून काळा पैसा पांढरा केल्याचे या दोघांनी मान्य केले आहे. याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 
१. ‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार राजीव सिंह हा कर सल्लागार आहे. कर सल्लागाराच्या व्यवसायाआड तो हवाला रॅकेट चालवत असून त्याने ५ आस्थापनांची नोंदणी केलेली आहे. 

२. राजीव सिंह यांच्यावर अनेक मोठ्या व्यापार्‍यांचा काळा पैसा सोन्यात पालटला असल्याचा आरोप आहे. तो फरार असून ईडी त्याचा शोध घेत आहे. 
३. ३२ ते ३५ लाख रुपये किलोने सोने विकत घ्यायचे आणि हेच सोने ४५ लाख रुपये किलोने विकण्याचे काम राजीव सिंह करायचे. 
४. राजीव सिंह यांनी ज्या ज्या व्यापार्‍यांचा काळा पैसा पालटून दिला, त्या सर्वांचा शोध चालू आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. 
५. अल्प दरात सोने विकत घेऊन ते चढ्या भावाने विकण्याची ‘मोडस् ऑपरेन्डी’ अ‍ॅक्सिस बँकेच्या अनेक शाखांमध्ये चालत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. ६. ३९ कोटी ८० लाख रूपये इतके काळे धन पांढरे करण्यासाठी शोभित सिन्हा आणि विनीत गुप्ता यांना प्रत्येकी १ किलो सोने देण्यात आले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn