Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सिलेंडरचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या वितरकाला पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी रोखले !

चिंचवड, २० डिसेंबर (वार्ता.) - सिलेंडर घरपोच देण्याचे अतिरिक्त पैसे मागणार्‍या व्यक्तीला (सिलेंडर देणार्‍या डिलिव्हरी बॉयला) येथील सनातनच्या साधिका सौ. प्रीती जोशी यांनी वरिष्ठांकडे तक्रार नोंदवून धडा शिकवला.
  • १८ नोव्हेंबर या दिवशी सिलेंडर आणून देणार्‍या व्यक्तीने सौ. जोशी यांच्याकडे दिवाळीनिमित्त अतिरिक्त पैशांची (बोनस) मागणी केली. सौ. जोशी यांनी दिवाळी होऊन गेल्याचे सांगितल्यावरही ‘दिवाळीत तुम्ही सिलेंडर घेतला नव्हता’, असे सांगत अतिरिक्त पैसे मागितले. (वेतन मिळत असूनही ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन त्यांना लुबाडणार्‍या अशा सिलेंडर वितरकांपासून सावधान ! - संपादक)
  • प्रत्येक मासाला (महिन्याला) ती व्यक्ती सिलेंडरच्या रकमेपेक्षा अतिरिक्त पैशांची मागणी करत असे आणि पैसे न दिल्यास अयोग्य भाषेत बोलत असे. ‘तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची आहे ते करा. मी घाबरत नाही’, असे दटावले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला सौ. जोशी यांनी ५ रुपये अतिरिक्त दिले.
  • अशा प्रकारे अनावश्यक पैसे देणे मनाला खटकल्याने सौ. जोशी यांनी पावतीवरील दूरभाष क्रमांकावर ‘गॅस एजन्सी’च्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार नोंदवली. गॅस एजन्सीच्या कार्यालयातून ‘सिलेंडर वितरकांना एक रुपयाही अतिरिक्त देऊ नका’, असे सांगण्यात आले.
  • त्यानंतर या तक्रारीची नोंद घेत संबंधित अधिकार्‍यांनी असा प्रसंग घडल्यास पुन्हा संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच संबंधित सिलेंडर वितरकाने सौ. जोशी यांचे अतिरिक्त घेतलेले ५ रुपये त्यांना परत केले. (लाचखोर वृत्तीला आळा घालणार्‍या सौ. जोशी यांचे अभिनंदन ! वितरकाने मागितलेली रक्कम अल्प आहे कि अधिक याचा विचार न करता नागरिकांनीच अशा लाचखोर वृत्तीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn