Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ख्रिस्ती सेवाभावी संस्थांवर कारवाई करणार्‍या प्रामाणिक अधिकार्‍याचे अमेरिकेच्या दबावाखाली स्थानांतर !

काँग्रेसच्या काळात सेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या 
ख्रिस्त्यांच्या संस्थांवर कारवाई होत नव्हती, ती आताच्या सरकारमधील अधिकारी 
करत असतांना त्या अधिकार्‍यांवर कारवाई करणारे सरकार काँग्रेसची आठवण करून देते !
     नवी देहली - गृह मंत्रालयात कार्यरत असलेले अतिरिक्त सचिव श्री. बिपीन मलिक यांनी धर्मांतराच्या आरोपांचे सावट असलेल्या ख्रिस्ती सेवाभावी संस्थांवर कडक कारवाई केल्याने केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली त्यांचे गृह मंत्रालयातून स्थानांतर केले. श्री. मलिक यांनीच डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी आणण्याची पाऊले उचलली होती. वरवर बालकल्याणासाठी कार्यरत असलेल्या अमेरिकेतील ‘कम्पॅशन इंटरनॅशनल’ या सेवाभावी संस्थेविरुद्ध भारतीय गुप्तचर खात्याचा प्रतिकूल अहवाल आल्याने श्री. मलिक यांनी सरकारच्या धोरणानुसार या संस्थेला अनुमती घेतल्याविना विदेशी देणग्या स्वीकारण्यास बंदी केली होती. या संस्थेचे अमेरिकेच्या शासनात उच्च स्तरावर चांगले संबंध असल्यामुळे अमेरिकेने भारत शासनास २ वेळा ‘कम्पॅशन इंटरनॅशनल’विरुद्ध केलेल्या कारवाईसंबंधी विचारणा केली होती.
     तसेच श्री. मलिक यांनी गेल्या मासांत २५ ख्रिस्ती सेवाभावी संस्थांना त्यांच्या लिखित उद्दिष्टांचा भंग करून देशाविरुद्ध कारवाया केल्यासाठी त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यास अनुमती नाकारली होती. काँग्रेस सरकारच्या काळात देशात सेवाभावी संस्थांचे पीकच आले होते. त्यांची संख्या ४० सहस्र एवढी पोचली होती. 
    श्री. मलिक यांनी त्यांतील १९ सहस्र निक्रीय सेवाभावी संस्थांची नोंदणी रहित केली होती. (अशा कार्यक्षम अधिकार्‍याला त्याच्या प्रामाणिकपणाचे पारितोषिक देण्याऐवजी त्याचे स्थानांतर करून एक प्रकारची शिक्षाच देण्यात आली. त्यामुळे जे काही अल्प अधिकारी प्रामाणिक आणि कार्यक्षम आहेत त्यांचे मनोबल खचण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या ह लक्षात येत नाही काय ? तसेच अमेरिकेला भारताच्या अंतर्गत गोष्टींत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता काय ? अमेरिकेशी मैत्री करतांना ती समान तत्त्वावर होण्याऐवजी त्या देशाची बटीक म्हणून वावरणे योग्य होईल काय ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn