Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे.  त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१८.१२.२०१६ - जयपूर, राजस्थान
१. चेन्नईहून जयपूरला प्रयाण
    आज सकाळी १० वाजता आम्ही चेन्नईहून जयपूरला विमानाने जाण्यासाठी निघालो आणि तेथे दुपारी अडीच वाजता पोचलो.
२. देवतांची दर्शने
    येथे आम्हाला महर्षींनी देवतांची दर्शने घ्यायला सांगितले आहे. प्रथम येथून १६० कि.मी. अंतरावर असलेल्या त्रिनेत्र गणपतीचे दर्शन घ्यायला सांगितले आहे. त्यानंतर येथील इतर मंदिरांतही जायला सांगितले आहे. तसेच तनोट येथील श्री तनोटमाता मंदिरात देवीचे दर्शनही घ्यायला सांगितले आहे. हे मंदिर राजस्थानमध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमारेषेवर आहे. परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी हा उपाय आहे.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn