Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अधिकोषांतील दायित्वशून्य कर्मचारी !

विविध मूल्यांच्या नोटांचा पुरवठा तातडीने पूर्ववत करून शासकीय अधिकोषांची (बँकांची) धोक्यात आलेली प्रतिमा सावरावी, असे आवाहन ‘भारतीय राष्ट्रीय अधिकोष कर्मचारी महासंघा’ने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला केले आहे. शासकीय आणि खाजगी अधिकोषांतील काही कर्मचार्‍यांच्या लबाडीमुळे कोट्यवधी रुपयांच्या नव्या नोटा नको त्यांच्या हाती लागल्या आहेत. यामुळे अधिकोषांची प्रतिमा मलीन झाली आहे. अधिकोष कर्मचार्‍यांनी अधिकोषांची विश्‍वासार्हता जपणे किती आवश्यक आहे, हे ज्ञात असूनही भ्रष्टाचार आणि काळ्याचे पांढरे करणार्‍यांना सहकार्य करून प्रामाणिक मार्गावर चालणार्‍या जनतेची खिल्ली उडवली आहे. अधिकोषांची प्रतिमा मलीन करायची कि स्वच्छ ठेवायची, हे कर्मचार्‍यांच्या हाती असते; पण जुन्याच्या बदल्यात नव्या नोटा पालटून देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या कमिशनच्या काही प्रतिशत रकमेसाठी नीतीमत्ता गहाण ठेवल्याने त्यापुढे अधिकोषांच्या प्रतिमेचे कोणाला काय मूल्य ? अधिकोषांची प्रतिमा खर्‍या अर्थाने कशामुळे डागाळत आहे, हे ठाऊक असूनही त्यावर सोयीस्कर मौन पाळले गेले आहे. म्हणजे कर्तव्यचुकार कर्मचार्‍यांनी जे केले आहे ते या महासंघास मान्य आहे, असे समजायचे का ?     जो काही नव्या नोटांचा पुरवठा रिझर्व्ह बँकेने केला आहे, त्यांपैकी ज्या नव्या नोटा लबाडांच्या हाती लागल्या आहेत, त्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर या अधिकोषाच्या माध्यमातून देशभर नव्या नोटा वितरीत करण्यात आल्या; पण हे आवाहनात्मक अभियान राबवतांना पैशांविषयी अधिकोषांतीलच कर्मचार्‍यांनी लबाडी केल्यास त्यांच्यावर त्वरित कोणती कायदेशीर कारवाई करता येईल, याचा अभ्यास केलेला नसल्याचे ही उजेडात आले आहे. परिणामी आज प्राप्तीकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयास देशभर छापे टाकावे लागत आहेत. नोटा छपाई ते पुरवठा ही साखळी कशी असते हे ठाऊक नसल्याप्रमाणे पोकळ आवाहन करण्यात आले आहे. नोटा जनतेपर्यंत पोचण्यात येत असलेल्या त्रुटींवर मात करत रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या नव्या नोटा जनतेपर्यंत कशा पोचतील, याविषयी वस्तूस्थितीचा लेखाजोखा घेत अभ्यासपूर्ण माहिती केंद्र शासनासमोर मांडायची सोडून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करण्यात आले आहे. जनतेला ज्यांच्यामुळे जाणीवपूर्वक त्रास सोसावा लागत आहे, अशा दायित्वशून्य अधिकोष कर्मचार्‍यांना कोण खडसावणार, या प्रश्‍नाचे उत्तर जनतेला मिळायलाच पाहिजे; कारण लबाडी करताना रंगेहात पकडल्यावरही त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने देशभर लबाडीच्या घटनांना उधाण आले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थकारणाचे स्रोत असणार्‍या या क्षेत्रास सुधारण्यासाठी केंद्र शासनाला कडक धोरणांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
- श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn