Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनच्या ग्रंथांचे मुद्रण आणि पुनर्मुद्रण करतांना येणार्‍या अडचणींवर आध्यात्मिक उपाय करताच ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होणे, याविषयी श्री. संतोष गावडे यांना आलेल्या अनुभूती

श्री. संतोष गावडे
१. मुद्रणातील त्रुटी आणि बारकावे कळल्यावर मनात नकारात्मक विचार येणे आणि त्याविषयी एका संतांशी बोलल्यावर त्यांनी देवाचे साहाय्य घेण्यास सांगणे : ‘ग्रंथांचे मुद्रण (छपाई) कोल्हापूर येथील मुद्रणालयात (प्रेसमध्ये) चालू झाल्यावर ग्रंथांच्या आतील पाने एका रंगात मुद्रित होत (छापली जात) नव्हती. त्यानंतर चार रंगांमध्ये मुखपृष्ठाच्या मुद्रणाला आरंभ झाला. त्या वेळी त्या सेवेसंबंधी बारकावे मला ठाऊक नव्हते. त्यामुळे मुद्रण झाल्यावर त्यातील त्रुटी किंवा बारकावे रामनाथी येथील साधक मला सांगत होते; परंतु त्याविषयी प्रत्यक्ष मुद्रणालयात आमच्या काही लक्षात येत नव्हते. त्यामुळे माझ्या मनात सतत ‘मला ही सेवा जमणार नाही, मला काही येत नाही’, अशा प्रकारचे नकारात्मक विचार येत होते; म्हणून त्याविषयी मी एका संतांशी बोललो. तेव्हा त्यांनी मला ‘सेवा करतांना देवाचे साहाय्य घ्या’, असे सांगितले.
२. मुद्रणालयात श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानसपूजा केल्यावर मुद्रणासंबंधी चुका तत्क्षणी लक्षात येणे अन् त्या सुधारताही येणे : मी मुद्रणालयात (प्रेसमध्ये) गेल्यावर मुद्रण यंत्राच्या जवळ भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना मानस आसन ठेवले अन् त्यांची मानसपूजा करून प्रार्थना केली, ‘तुम्हाला अपेक्षित असे ग्रंथांचे मुद्रण तुम्हीच आमच्या माध्यमातून करून घ्या.’ तसेच ‘श्रीकृष्ण माझ्या माध्यमातून मुद्रणासंबंधी सेवा पहात आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा मुद्रणातील चुका त्याच क्षणी लक्षात येऊन त्या लगेच सुधारता येऊ लागल्या. तसेच मुद्रण चालू असतांना मला चार रंगांतील मुद्रणासंबंधी बारकावेही शिकायला मिळाले. 
३. ठराविक ग्रंथांचे मुद्रण आणि पुनर्मुद्रण करतांना अडचणी येणे आणि आध्यात्मिक उपाय केल्यावर मुद्रण सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होणे : सनातनच्या ‘शिव, दत्त, सरस्वतीदेवी, मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र, दृष्ट काढणे, केसांच्या समस्या, केसांत जटा होण्याची कारणे, तसेच दोष घालवा - गुण जोपासा’ या ग्रंथांचे मुद्रण आणि पुर्नमुद्रण करतांना एकाच प्रकारच्या अडचणी येतात. त्या वेळी मी यंत्राजवळ चमेलीच्या तीन उदबत्त्या लावल्या. तसेच तेथे ‘भगवान श्रीकृष्ण आणि दत्त यांची सात्त्विक चित्रे ठेवणे, यंत्रांना सात्त्विक अत्तर अन् कापूर लावणे आणि यंत्राच्या चालकांनाही ते उपाय करण्यास सांगणे’ इत्यादी आध्यात्मिक उपाय केले. त्यानंतर ग्रंथांचे मुद्रण निर्विघ्नपणे पूर्ण झाले. माझ्या सहसाधकांनाही मुद्रणालयात अशा अनुभूती नेहमी येतात.’
- श्री. संतोष गावडे, कोल्हापूर (६.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn