Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संतमाता सौ. प्राजक्ता जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. सतत हसतमुख
     ‘प्राजक्ताताईंना काही मासांपासून तीव्र अर्धशिशी, हातापायांत गाठी येऊन ते कडक होणे, सर्दी-ताप इत्यादी अनेक आजार होत आहेत. असे असूनही त्या सतत आनंदी दिसतात. तशा स्थितीतही त्या पू. सौरभदादांच्या दिवसातून २ - ३ वेळा बालदीभर गोधड्या धुणे, वाळत घालणे, तेवढ्या कपड्यांच्या घड्या घालणे, त्यांना जेवण भरवणे, औषधे देणे, खोलीची स्वच्छता इत्यादी सर्व कामे करून ज्योतिषाच्या संदर्भातील सेवाही करत असतात. त्यांची ही अफाट कार्यक्षमता पाहून मी एकदा त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला एवढ्या वेदना होत असूनही तुम्ही आनंदी कशा रहाता आणि सगळ्या सेवा कशा पूर्ण करता ?’’, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला कधी रडता येतच नाही आणि कितीही आजारी असले, तरी मला झोपून रहाणे जमत नाही.’’
२. साधकांच्या कुंडलीतील ग्रहदशा पाठ असणे
    प्राजक्ताताईंनी एखाद्या साधकाची कुंडली मांडल्यावर कितीही महिन्यांनी अथवा वर्षांनी जरी त्यांना त्या साधकाची सद्य:स्थितीतील ग्रहदशा विचारली, तरी त्या साधकाच्या कुंडलीतील ग्रहदशा दिनांक, महिना, वर्ष यानुसार तोंडपाठ सांगू शकतात. ते सांगण्यासाठी त्यांना त्याची पत्रिका उघडून पहावी लागत नाही.
३. स्वीकारण्याची वृत्ती
    ताईंचा धाकटा मुलगा कु. दीप याचे मागच्या वर्षी १० वी चे वर्ष असल्याने त्यांना पू. सौरभदादांना सोडून कुडाळला घरी दीपजवळ रहावे लागले. प्रत्यक्षात ताईंना पू. सौरभदादांचा अतिशय लळा आहे. त्या आतापर्यंत कधीच त्यांना सोडून राहिल्या नव्हत्या, तरीही ती परिस्थिती त्यांनी आनंदाने स्वीकारली. तेव्हा एक संत त्यांना म्हणाले होते, ‘तुम्ही इथे किंवा कुडाळ कुठेही असलात, तरी नेहमीच आनंदी असता.
४. प.पू. डॉक्टरांप्रती भाव
    एकदा मी आणि प्राजक्ताताई बोलत असतांना ताईंनी पू. सौरभदादांच्या लहानपणापासून प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबावर केलेल्या अखंड कृपेचे प्रसंग सांगितले. ते प्रसंग सांगतांना त्या देहभान हरपून आणि पुष्कळ भावावस्थेत बोलत होत्या. त्या दिवशी प्रथमच प.पू. डॉक्टरांप्रती असलेल्या भावामुळे मी त्यांचे डोळे भरून आलेले पाहिले.
५. पू. सौरभदादांप्रतीचा भाव
५ अ. पू. सौरभदादांची सेवा भावपूर्ण करणे : पू. सौरभदादांची लहानपणी पातळी ठाऊक नसतांनाही तेव्हापासून ताई त्यांना ‘संत’ समजूनच त्यांची सेवा करत आहेत. तेव्हा त्यांचा धाकटा मुलगा दीप बाळ होता आणि पू. सौरभदादांचेही बाळाप्रमाणेच सर्व करावे लागायचे, तरीही त्यांनी कधी चिडचीड केली नाही.
५ आ. पू. सौरभदादांशी एकरूप असणे : ‘प्राजक्ताताई पू. सौरभदादांशी एकरूप झाल्या आहेत’, असे जाणवते. पू. दादांना रामनाथी आश्रमात असतांना त्यांना जे आजार होतात, तेच आजार ताईंना कुडाळला त्या घरी असतांना होतात. खरे पहाता पू. दादांना होत असलेल्या त्रासासंदर्भात त्यांना काही ठाऊक नसते.
५ इ. पू. सौरभदादांचा संदेश ओळखणे : प्राजक्ताताई पू. सौरभदादांचे गूढ भाषेतील बोलणे, पू. दादांना मिळत असलेल्या पूर्वसूचना इत्यादी सर्व ओळखू शकतात. त्या पू. दादांना भेटायला आलेल्या पाहुणे आणि संत यांची छायाचित्रे काढतात आणि कधी कधी चित्रीकरणही करतात. त्यामुळे विकलांग अवस्थेतील पू. सौरभदादांच्या संतत्वाचा इतिहास सर्वांना अनुभवण्यास मिळत आहे.
६. प्रेमभाव
६ अ. साधिकेसाठी थालीपिठे बनवणे : एकदा एक साधिका आजारी असतांना तिला थालीपीठ खावेसे वाटत होते. ती इच्छा तिने प्राजक्ताताईंना सांगितली. तेव्हा त्या कुडाळला घरी गेल्या होत्या. तिची इच्छा लक्षात ठेवून त्यांनी कुडाळहून येतांना तिच्यासाठी ४ - ५ थालीपिठे बनवून आणली.
६ आ. साधकांचे वाढदिवस ठाऊक असणे : ताईंना कोणत्याही साधकाचा वाढदिवस कधी आहे, हेही ठाऊक असते आणि त्याच्या वाढदिवसाला त्यांनी केलेले कागदी फूल, खाऊ किंवा एखादी भेटवस्तू त्या आवर्जून देतात.
६ इ. साधकांनी मनमोकळेपणाने बोलणे : ‘प्राजक्ताताई गोपनीय गोष्टी कोणाला सांगणार नाहीत’, या विश्‍वासामुळे साधक त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलतात. सर्वांना त्यांचा आधार वाटतो.
६ ई. साधकांना प्रोत्साहन देणे : प्राजक्ताताईंकडे कधी वयाने लहान-मोठा कोणीही साधक निराश अवस्थेत गेला, तर ताई त्याला निराशेतून बाहेर येण्यासाठी विविध प्रकारे प्रोत्साहन देतात. कधी कधी त्या प्रबोधनपर एखादी गोष्टही सांगतात. असे केल्याने साधक स्वतःचे वय आणि निराशा विसरून त्या गोष्टीत रमतात आणि त्याच्या मनावरील ताण लगेच हलका होऊन त्या गोष्टीतील बोध घेऊन पुन्हा उत्साहाने सेवेला आरंभ करतो.
६ उ. समाजातील व्यक्ती आणि साधक यांचा विश्‍वास संपादन करणे : प्राजक्ताताईंनी कुडाळमध्येही समाजातील व्यक्ती, शेजारी, साधक अशी अनेक माणसे प्रेमाने जोडून ठेवली आहेत. गेल्या ३ - ४ वर्षांपासून प्राजक्ताताई रामनाथी आश्रमात रहातात आणि क्वचितच घरी जातात. असे असूनही अजूनही ताईंना लागेल ते सर्व प्रकारचे साहाय्य करायला कधीही कोणीही तत्पर असतो. त्या सर्वांचा ताईंनी विश्‍वास संपादन केला आहे.
६ ऊ. प्राजक्ताताईंभोवती साधकांचा घोळका होणे : प्राजक्ताताई पू. सौरभदादांच्या सेवेमुळे बहुतेक वेळ खोलीतच असतात. काही सेवेनिमित्त त्या खोलीतून बाहेर पडल्यास त्या जिथे जातील, तिथे साधकांचा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याभोवती घोळका जमतो. तेव्हा बर्‍याच दिवसांनी ताई भेटल्याचा आनंद साधकांच्या तोंडवळ्यावर दिसतो.
७. संतांची कृपा संपादन करणे
    प्राजक्ताताई आजारी असतांना त्या बर्‍या होईपर्यंत संत त्यांना सातत्याने प्रसाद पाठवायचे. प.पू. दास महाराज, पू. माई, प.पू. गिंडे महाराज आणि सनातनचे संत यांच्याशीही ताईंची जवळीक आहे. ते सर्व संत ताईंना अधूनमधून संपर्क करत असतात.
    देवा, अशा या संतमातेचे गुण तू अनुभवायला देत आहेस, त्याबद्दल तुझ्या चरणी अनंत वेळा कृतज्ञता !’
- कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn