Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तुम्हीच अवघे कर्ता-करविता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले 
श्रीमती मेघना वाघमारे
     ९.१२.२०१६ या दिवशी सकाळच्या वेळी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘नामस्मरण भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यावर श्रीमती मेघना वाघमारे यांना आलेल्या अनुभूती’ आणि त्यासमवेत परात्पर गुरुदेवांची प्रसिद्ध झालेली चौकट वाचली. सकाळपासून भेटलेल्या साधकांनी माझे कौतुक केले. तेव्हा वाटले, ‘यात माझे कसले कौतुक ! हे तर सारे प.पू. गुरुदेवांचे आहे. त्यांच्या कृपेनेच हे सारे घडत आहे अन् होत आहे.’ मी प्रत्येक वेळी साधकांनी केलेले कौतुक प.पू. गुरुदेवांना मनोमन अर्पण करत होते. त्यानंतर नामस्मरणाला बसले असतांना प.पू. गुरुदेवांच्या कृपेने स्फुरलेल्या पद्यपंक्ती त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.
    कौतुक कशास्तव माझे करता । 
    तुम्हीच अवघे कर्ता-करविता ॥ १ ॥

    उत्कटतेने नाम घेता तुम्हाकडे मन धावता ।
    भावस्पंदने तुम्ही प्रक्षेपिता अन् मम हृदयी भाव निर्मिता ॥ २ ॥

     नामासंगे तव रूप स्मरता नामस्मरणी दर्शन देता ।
     नयनांमध्ये अश्रू दाटता होई झरझर अश्रुपाता ॥ ३ ॥

     भावडोही जीव डुंबता होई प्रार्थना एकच आता ।
     ठेवी चरणी या शरणागता अन् देई अखंड भाव कृतज्ञता ॥ ४ ॥

- श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn