Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी आश्रमातील सुकून गेलेली अश्‍वत्थ आणि तुळस यांची रोपे अन् पारिजातकाचा वृक्ष यांना महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार सुवर्णसिद्ध जल घालणे, याचे सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
      ‘रविवार, १३.११.२०१६ या दिवशी दुपारी ४ वाजता भृगुसंहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात वाळलेली अश्‍वत्थ आणि तुळस यांची रोपे अन् वाळलेला पारिजातकाचा वृक्ष यांना सुवर्ण घालून तापवून नंतर थंड केलेले पाणी (सुवर्णसिद्ध जल) घातले. या कृतीचे सूक्ष्म-स्तरावरील परिणाम सूक्ष्म-परीक्षणाद्वारे विशद करत आहे.
१. रविवारच्या दिवशी दुर्बळ आणि क्षीण 
झालेल्या वृक्षांना सुवर्णाचा अंश असणारे जल वाहणे
सुवर्ण हा धातू रवि, म्हणजे सूर्य याच्याशी संबंधित आहे. अन्य दिवसांच्या तुलनेत रविवारी सोन्यामध्ये असणारे दैवी तेज हे शतपटींनी अधिक प्रमाणात प्रगट होऊन कार्यरत असते.
वाळलेले अश्‍वत्थाचे रोप
      रविवारच्या दिवशी दुर्बळ आणि क्षीण झालेल्या वृक्षांना सुवर्णाचा अंश असणारे जल घातल्यामुळे त्यांना सुवर्णामध्ये असणार्‍या सवितृदेवेतेच्या मूळ तेजाचा शतपटींनी लाभ होतो, तसेच १२ आदित्यांच्या अंशात्मक शक्तीचाही लाभ होतो. सोन्यामध्ये रवीचे तेज समाविष्ट झाल्यामुळे सुवर्णाला ‘हिरण्य’ ही संज्ञारूपी अवस्था प्राप्त होते. सुवर्णामुळे आयुष्याची वृद्धी आणि सूर्यामुळे आरोग्याची वृद्धी होते. आयुष्य आणि आरोग्य या दोघांची वृद्धी होण्यासाठी महर्षि भृगु यांनी रविवारी सोनेमिश्रित जल दुर्बळ अन् क्षीण झालेल्या वृक्षांना घालण्यास
वाळलेली तुळस
सांगितले आहे. (पारिजातकाच्या वृक्षाला पाणी घातल्यानंतर अळीप्रमाणे दिसणारा कीटक वृक्षाच्या मुळातून स्थुलातून बाहेर आला आणि लगेच मातीत गेला. त्यामुळे त्याचे छायाचित्र काढता आले नाही. - कु. मधुरा)
२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या
हस्ते पाणी घातल्याने लक्ष्मीतत्त्वाचा लाभ होणे
     सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा पाण्याच्या पात्राला स्पर्श झाल्यामुळे लक्ष्मीतत्त्वाने युक्त असणार्‍या चैतन्याचा लाभ होऊन तिन्ही वृक्षांभोवती सुवर्णमय आच्छादन निर्माण झाले.
आश्रम परिसरात
वाळलेला पारिजातकाचा वृक्ष
३. वृक्षांच्या मुळाशी सुवर्ण अंशाचे पाणी घातल्यामुळे 
झाडांनी सुवर्णजल प्राशन केल्याने झालेले लाभ 
अ. पूर्वजन्मातील दोषांचे निवारण होणे 
      मानव सोडून इतरांनाही पूर्वजन्मातील दोष लागणे
१. सात्त्विक; परंतु अधःपतित झालेल्या जिवांना शापित जीवन भोगून संपवतांना अखंड साधनारत रहाता यावे, यासाठी सात्त्विक ठिकाणी जन्म मिळणे : ‘जे जीव अध:पतित झालेले आहेत, त्यांना पूर्वजन्मातील कर्मामुळे विविध दोष लागतात. त्यांना त्यांच्या पूर्वकर्मामुळे वनस्पती, पशू आणि पाषाण होऊन पडावे लागते. सात्त्विक; परंतु अधःपतित झालेल्या जिवांना शापित जीवन भोगून संपवतांना अखंड साधनारत रहाता यावे, यासाठी त्यांचा जन्म देवस्थानाच्या परिसरात किंवा संत, तसेच गुरु यांच्या आश्रमाच्या समीप झालेला असतो.
२. देवगुरु बृहस्पती यांचा अपमान केल्यामुळे उच्च स्वर्गलोकातील जिवांना रामनाथी आश्रमात पारिजातक वृक्ष, तुळस आणि आणि अश्‍वत्थ यांचे रोप यांचा जन्म मिळणे अन् त्यांना सुवर्णसिद्ध जल घातल्यामुळे त्यांच्या पूर्वजन्मातील दोषांचे निवारण होणे : अशाच प्रकारे रामनाथी आश्रमाच्या परिसरातील पारिजातकाचा वृक्ष आणि अश्‍वत्थ अन् तुळस यांचे रोप हे गेल्या जन्मी उच्च स्वर्गलोकात निवास करणारे हिरण्य, हिरण्यमयी आणि हिरण्यकेतु नावाचे दैवी जीव होते. त्यांच्याकडून देवगुरु बृहस्पती यांचा अपमान झाल्यामुळे त्यांना पृथ्वीतलावर वनस्पतीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला. ते अनुक्रमे पारिजातकाचा वृक्ष आणि तुळस अन् अश्‍वत्थ यांचे रोप झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुवर्णसिद्ध जल घातल्यामुळे त्यांच्या पूर्वजन्मांतील दोषांचे निवारण झाले. 
३. वनस्पतींच्या उदाहरणातून दिसून येणारी सप्तर्षींची सर्वज्ञता आणि प्रीती ! : पारिजातकाचा वृक्ष आणि तुळस अन् अश्‍वत्थ यांचे रोप हे शापित जीवन व्यतीत करत असतांना ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील समष्टी आक्रमणे स्वत: झेलत असल्यामुळे त्यांची स्थिती मरणप्राय झालेली आहे. या तिन्ही जिवांचा श्रीविष्णूचे अवतार असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असणारा भाव, समर्पण आणि त्याग यांची पूर्ण कल्पना सप्तर्षींना असल्यामुळे ते या वनस्पतींना पुनर्जीवन देण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करण्यास सांगत आहेत. या प्रसंगांवरून महर्षींची सर्वज्ञता आपल्याला दिसून येते, तसेच त्यांच्यातील प्रीतीचीही प्रचीती येते.’
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१६, रात्री ८.४९)
आ. ‘समष्टी पुण्याचे वर्धन अल्प कालावधीत होणे
इ. आध्यात्मिक तेज प्राप्त होऊन बलप्राप्ती होणे 
ई. सुवर्णाचा अंश धारण केल्यामुळे ‘हिरण्यमय सुरक्षा कवच’ प्राप्त होणे
उ. भूमीतून प्रक्षेपित होणार्‍या हिरण्यगर्भ लहरी वृक्षांनी धारण केल्यामुळे त्यांची प्रजननक्षमता वृद्धींगत होऊन त्यांना नवीन पालवी फुटणार असणे
४. अश्‍वत्थ, तुळस आणि पारिजातक या वृक्षांना 
सुवर्णमिश्रित पाणी घातल्यामुळे झालेल्या परिणामांचा तौलनिक अभ्यास 
५. भृगु महर्षींप्रती कृतज्ञता !
      भृगु महर्षींनी वृक्षांना सुवर्णमिश्रित जल अर्पण करण्यास सांगून एक प्रकारे दैवी शक्तीचा स्रोतच दिला आहे. भृगु महर्षींनी सुवर्णजलरूपाने नवसंजीवनीच प्रदान करून सुकून गेलेल्या आणि मरणोन्मुख अवस्था प्राप्त झालेल्या तिन्ही वृक्षांना पुनर्जीवन प्रदान केले आहे, यासाठी भृगु महर्षींनी चरणी आम्ही सर्व साधक नतमस्तक होऊन भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’ 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०१६, रात्री ९.५४)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn