Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘डॉ. झाकीर नाईक हे देशाविरुद्ध कोणतेच काम करत नाहीत !

‘पडलो तरी पाय वर’ ही म्हण सार्थ ठरवत देशद्रोह्यांची तळी उचलून 
धरणारे अबू आझमी यांची मुक्ताफळे अबू आझमी यांना कायद्याचे भय 
न राहिल्यामुळेच ते उघडपणे आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ. झाकीर 
नाईक यांचे समर्थन करण्यास धजावतात ! त्यांच्यावर आताच कारवाई केली 
नाही, तर भविष्यात त्यांनी बगदादीचे समर्थन केले, तर आश्‍चर्य वाटायला नको !
      नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - डॉ. झाकीर नाईक यांच्याविरुध्द कोणताच आरोप सिद्ध झालेला नाही. ते धार्मिक प्रवचन देतात, त्यांच्या संस्थेवर केलेली बंदी चुकीची आहे, अशी दर्पोक्ती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ९ डिसेंबरला केली. (डॉ. झाकीर नाईक हे आतंकवाद्यांना साहाय्य करतात, त्यांच्या भाषणामुळे मुसलमान मुले आतंकवादी होतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे. त्या पोलीस यंत्रणांपेक्षा अबू आझमी हुशार आहेत का ? - संपादक)
     इस्लामी धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालणे चुकीचे आहे. डॉ. नाईक यांच्या संस्थेला बाहेरील देशातून पैसे देण्यात आले आहेत; मात्र ते देशाविरुद्ध कोणतेच काम करत नाहीत. (अशी खोटी माहिती देऊन समाजाची दिशाभूल करणार्‍या अबू आझमी यांच्यावर भाजप शासनाने कठोर कारवाई करायला हवी. - संपादक) भाजपला सत्तेचा माज आला आहे. भाजप धर्माच्या नावाने देशाला तोडण्याचे काम करत आहे. आधी या देशावर मुसलमानांनी ९०० वर्षे राज्य केले आहे; मात्र मुसलमान समाजाने असे कधीच केले नाही. (मुसलमानांनी देशावर ९०० वर्षे राज्य करतांना लक्षावधी हिंदूंची कत्तल, सहस्रों मंदिरांची तोडफोड, लुटालूट करून लक्षावधी हिंदु मुली आणि स्त्रियांची अब्रू लुटली आहे. हा रक्तरंजित इतिहास सर्वांना ठाऊक असतांना मुसलमानांचे गोडवे गाणार्‍या अबू आझमी यांना सर्व हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करण्याची वेळ आली आहे. - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn