Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देऊ ! - राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस-प्रशासन यांना निवेदने ! 
उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे (डावीकडून तिसरे)
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.) - ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार थांबवण्याविषयी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना ३० नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. निवेदनाची नोंद घेत ‘अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवण्याचे आदेश देऊ’ असे आश्‍वासन मुठे यांनी दिले. या वेळी अखिल राजस्थानी समाज संघाचे महासचिव सर्वश्री मोहनसिंह राजपुरोहित, योग वेदांत सेवा समितीचे सुधाकर संगनवार, धर्माभिमानी अशोक केडगे आणि हिंदु जनजागृती समितीचे दीपक आगवणे उपस्थित होते.
भोरच्या तहसीलदार सौ. वर्षा शिंगण पाटील
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
असेच निवेदन महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनाही देण्यात आले. ‘या संदर्भात महानगरपालिकेकडून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातील’, असे आश्‍वासन त्यांनी दिले. ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला होणारे मद्यपान, धूम्रपान, सार्वजनिक, तसेच ऐतिहासिक ठिकाणी होणार्‍या मेजवान्या आदी अपप्रकारांना प्रतिबंध घालावा, तसेच संस्कृतीरक्षणासाठी सहकार्य करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. 
१. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक
पोलीस निरीक्षक शिंदे यांना निवेदन
देतांना समितीचे कार्यकर्ते 
(गुन्हे) अरविंद जोंधळे यांना ३० नोव्हेंबरला निवेदन देण्यात आले. तेव्हा त्यांनी ‘अयोग्य प्रकार घडणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. त्यासाठी अधिक बंदोबस्त केला जाईल. समितीचे साहाय्य लागल्यास सांगू’ असे सांगितले. या वेळी शिववंदना गटाचे सर्वश्री पराग ढोरे, उमेश पवार, ‘सांगवी विकास मंच’चे महेश भागवत, धर्माभिमानी सचिन खेले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदीप चोपदार, धनाजी गळवे, चंद्रशेखर भोईटे आणि सनातन संस्थेचे श्री.
भोरचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावर
(उजवीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
 अविनाश लोणे आदी उपस्थित होते. 
२. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांना धर्माभिमानी सर्वश्री रामनाथ दास, समितीचे गजानन मुंज, चंद्रशेखर घोलप आणि अमोल मेहता यांनी १ डिसेंबर या दिवशी निवेदन दिले. तसेच सहकारनगर, स्वारगेट, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांतही निवेदने देण्यात आली. 
३. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक बागवडे आणि श्री. ईश्‍वर तांदळे यांनी ‘सिंहगड कॉलेज ऑफ
‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’चे प्राचार्य डॉ. गुजर
(उजवीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
फार्मसी’चे प्राचार्य डॉ. गुजर, ‘सिंहगड डेंटल मेडिकल कॉलेज’चे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, ‘सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चे प्राचार्य श्री. रेड्डी आणि ‘सिंहगड आर्किटेक्ट कॉलेज’चे प्राचार्य यांच्या नावे श्रीमती बनर्जी यांना निवेदन दिले. 
४. ३ डिसेंबर या दिवशी भोर येथील तहसीलदार सौ. वर्षा शिंगण पाटील आणि पोलीस उपअधीक्षक विलास येमवार यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे सर्वश्री अप्पा मळेकर, योग वेदांत सेवा समितीचे अशोक बारीक, सौ. राजश्री शेटे, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री शिंदे आणि समितीचे श्री. विश्‍वजीत चव्हाण आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते. 
पुणे आयुक्त कुणाल कुमार (डावीकडे)
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
(गुन्हे) अरविंद जोंधळे (डावीकडे) यांना निवेदन
देतांना समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी
अपप्रकार रोखण्यासाठी पथक नेमण्याचा शिरवळ पोलिसांचा निर्णय 
शिरवळ पोलीस उपअधीक्षक रवींद्र कदम 
(उजवीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी 
      शिरवळ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी अपप्रकार रोखण्यासाठी एक पथक कार्यरत असेल, असे आश्‍वासन कदम यांनी दिले. या प्रसंगी महिला धर्मप्रेमी सौ. निर्मला कुचेकर, सौ. नलिनी राऊत, सौ. संगीता साठे, कु. दिपाली जाधव, रणरागिणी शाखेच्या सौ. छाया पवार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सत्यज्योत मित्रमंडळाचे २२ कार्यकर्ते, धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी, सनातन संस्थेचे गोपाल भूतकर, तसेच समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn