Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्र : मूलभूत विचार

वाचा नवीन सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन !
     वर्ष २०२३ पासून हिंदु राष्ट्र येईल, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !
३. हिंदु राष्ट्राची मागणी करणे, 
हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार !
     हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारला, तरी पुरोगामी, निधर्मी, अन्य पंथीय आणि प्रसारमाध्यमे हिंदु राष्ट्राची मागणी ही घटनाबाह्य आहे, असा थयथयाट करतात. राज्यघटनेचा अर्धवट अभ्यास करणार्‍यांनी हिंदु राष्ट्राची मागणी ही संवैधानिकच आहे, हे समजून घेतले पाहिजे. 
अ. देशाच्या मूळ राज्यघटनेत सेक्युलर असा उल्लेख नव्हता. इंदिरा गांधींनी १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घुसडले. 
आ. १ ऑगस्ट २०१५ पर्यंत देशाच्या राज्यघटनेत १०० वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. घटनादुरुस्तीद्वारे जर भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवता येते, तर मग अशा घटनादुरुस्तीच्या माध्यमातून भारत हे हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? 
इ. राज्यघटना हिंदूंना मत असण्याचा आणि तो प्रसारित करण्याचा अधिकार देते. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेचा प्रसार करणे, हा हिंदूंचा घटनादत्त अधिकार आहे.
ई. हिंदु राष्ट्र हा शब्द संवैधानिक कि असंवैधानिक असा प्रश्‍न निर्माण होऊ शकत नाही. ती पूर्णपणे समाज आणि राष्ट्र यांच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया आहे. संविधानाच्या चौकटीत राहून समाज आणि राष्ट्र यांच्या हिताची संकल्पना मांडणे, हे पूर्णतः संवैधानिक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे कोणतेही परिवर्तन करण्यास राज्यघटनेने पूर्णतः स्वातंत्र्य दिले आहे. असे परिवर्तन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी होणार असेल, तर त्यात अनुचित वाटण्यासारखे काही नाही. जोपर्यंत हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे विचार मांडणार्‍या व्यक्ती असंवैधानिक कृत्ये करत नाहीत, तोपर्यंत त्यांना असंवैधानिक म्हणणे, हा त्यांच्यावरील अन्याय आहे. 
उ. राज्यघटनेच्या ३६८ व्या अनुच्छेदातील पहिल्या प्रावधानात स्पष्टपणे म्हटले आहे, या अनुच्छेदात घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार देशाच्या संविधानात काहीही असले, तरी संसदेला आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून या संविधानाच्या कोणत्याही प्रावधानामध्ये अधिक भर घालून, फेरबदल करून किंवा तिचे निरसन करून सुधारणा करता येईल.
      तात्पर्य, हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार आहे. (१९.१०.२०१५)
४. हिंदु राष्ट्र या शब्दाला विरोध करणार्‍यांना पुढील प्रश्‍न विचारा !
अ. हिंदु राष्ट्र स्थापन करून सर्व जातीपंथांचे परमकल्याण साधता येते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध केले आहे. असे परिवर्तन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी होणार असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही ! 
आ. पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी १९९९ मध्ये भारताच्या दौर्‍यात केलेले संपूर्ण भारत ख्रिस्तमय करायचा आहे, हे वक्तव्य आजपर्यंत कोणीच घटनाबाह्य का ठरवले नाही ? 
इ. अत्यंत पुढारलेला आणि लोकशाहीप्रधान देश असूनही इंग्लंड एक ख्रिस्ती राष्ट्र आहे; मग ८० टक्के हिंदु धर्मीय असलेला भारत हिंदु राष्ट्र का नाही ? 
ई. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या राज्यघटनेत इस्लामिक रिपब्लिक असे लिहिले आहे; मग भारत हा हिंदु प्रजासत्ताक का असू नये ? इस्लामी राष्ट्रात हिंदू राहू शकतात; मग हिंदु राष्ट्रात मुसलमान आणि ख्रिस्ती लोक राहू शकत नाहीत, असे कधी होऊ शकेल का ?
उ. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात रहाणार्‍या तत्कालीन मुसलमानांनी स्वतःसाठी धर्मावर आधारित पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र मागितले होते. त्यानुसार उर्वरित हिंदूंचा भारत हिंदु राष्ट्रच व्हायला हवे होते. हिंदूंनी हिंदु राष्ट्राची नैसर्गिक मागणी करणे, हा गुन्हा कसा असू शकेल ?
ऊ. उद्या आयएस्आयएस्च्या आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करून त्याला इस्लामी राष्ट्र घोषित केले, तर हिंदू आश्रयासाठी जाणार कुठे ? जगात हिंदूंचा एकही देश नाही ! (१९.१०.२०१५)(क्रमश:) 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी सनातन शॉप च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn