Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आत्मानुसंधानाची प्रक्रिया

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज 
१. ‘आत्मानुसंधानाच्या वेळी आतून सांगणारा आत्माच असतो. 
२. आपले सांगणे हे आत्मानुसंधान झाले पाहिजे. असे आत्मानुसंधान असलेले सांगणे समोरच्या व्यक्तीच्या आत्मानुसंधानाशी संमिलीत होऊन त्याच्यातील आत्मा जेव्हा जागृत करील, तेव्हा त्याला आपल्याप्रमाणे वाटायला लागेल. येथपर्यंत प्रक्रिया होऊन कार्य झाल्यास ‘ते कार्य झाले’, असे समजावे अन्यथा नाही. म्हणजे आपले सांगणे हे ‘मी सांगतो’ यापेक्षा ‘आत्म्याद्वारे सांगणे’ असे होणे अपेक्षित आहे.
३. प.पू. डॉक्टरांंचे चैतन्य स्वतःतील चैतन्याशी अनुग्रहीत होऊन त्यातून स्फुरणारे विचार समोरच्या व्यक्तीला क्रियाशील करतील. त्यामुळे त्याच्यातील संवेदना जागृत होऊन त्या व्यक्तीची धारणा पालटेल. तेव्हा धर्मप्रसाराचे कार्य योग्य पद्धतीने परिणामकारक होत राहील. 
     हे जग चैतन्यमय आहे आणि येथील प्रत्येक कर्म चैतन्याद्वारेच होत असते, हे यावरून दिसून येते.’ 
- प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
सनातनचे कार्य सत्यावर आधारित असल्याने सनातन कडेच
 इतरांना आकर्षून घेण्याची अन् आनंद देण्याची शक्ती आहे !
     ‘सनातनचे कार्य सत्य आणि शाश्‍वत गोष्टींवर आधारित आहे. सत्याकडे फसवेगिरी नसते. सत्य हे काळ्या दगडावरच्या रेषेप्रमाणे असते. साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एकही वाक्य विसरत नाहीत; कारण ते जसे बोलतात, त्याप्रमाणे ते वागतात. त्यांचे बोलणे सत्य असते; म्हणून त्यावर विश्‍वास बसतो. सत्याकडे आकर्षून घेण्याची आणि आनंद देण्याची शक्ती असते. जीवनात सर्व भेटेल; पण आत्मीयता आणि आनंद देण्याची शक्ती भेटणार नाही. कुणाला जवळ घेऊन प्रेमाने हात फिरवणारा भेटत नाही. घरात राहून दूरत्व असते. कित्येक ठिकाणी लोकांसाठी घर म्हणजे केवळ ‘विश्रांतीगृह (रेस्ट हाऊस) झाले आहे. या परिस्थितीत साधकांना सनातनचे आश्रम हेच घर वाटते.’
- प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn