Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आपत्काळात ईश्‍वरच साधकांचे रक्षण करणार आहे, हे सूचित करणारी साधिकेला आलेली अनुभूती !

कु. मनीषा माहुर
१. स्वप्नात आश्रम नष्ट होत असून
३ देव साधकांच्या रक्षणासाठी आल्याचे दिसणे
    १.९.२०१५ या दिवशी सकाळी ९.३० ते ११ या कालावधीत मला एक स्वप्न पडले. त्यामध्ये मला पुढील दृश्य दिसले - आम्ही रहात असलेला आश्रम नष्ट होत आहे आणि तेथे केवळ अर्धे छप्पर आणि भूमी राहिली आहे. तो आश्रम एवढा पडला आहे की, त्यामधून आकाश दिसत आहे. आम्ही जेथे होतो, तेथे अगदी समोरच सूर्योदय झाला आहे आणि तेथून ३ देव साधकांच्या रक्षणासाठी आले आहेत. त्या देवांचा आकार लहान आहे आणि त्यांनी साधकांच्या रक्षणासाठी चारही बाजूंनी संरक्षक कवच निर्माण केले आहे. हा फारच मोठा आपत्काळ चालू आहे आणि तरीही साधकांचे मात्र रक्षण होत आहे.
२. स्वप्नात दिसलेल्या तीन देवांनी साधकांना त्यांच्या
रक्षणासाठी शक्ती देऊन परत सूर्याच्या दिशेने जातांना
वळून पहाणे आणि साधकांनी नमस्कार केल्यावर त्यांनी आशीर्वाद देणे
    ते तीन देव साधकांना त्यांच्या रक्षणासाठी शक्ती देऊन परत सूर्याच्या दिशेने जात असतांना आमच्याकडे वळून पहात होते. त्यांमध्ये उजव्या बाजूला कमळाच्या फुलामध्ये भगवान श्रीविष्णु उभा आहे. मध्यभागी कोणता देव आहे, ते लक्षात आले नाही आणि डाव्या बाजूलाही मिशा असणारा एक देव असून तो कुत्र्याप्रमाणे दिसणार्‍या कुठल्यातरी मोठ्या वाहनावर विराजमान आहे. ते देव परत जात असतांना मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनीही मला नमस्कार केला. मी त्यांना साष्टांग नमस्कार केल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिला. आम्ही ज्या कृती करत होतो, त्या कृती देव पहात होते आणि प्रतिसाद देत होते.
३. देव अदृश्य झालेल्या ठिकाणी चंदेरी रंगाचे चमकणारे कण गोलाकार फिरतांना दिसणे
आणि त्यानंतर त्या कणांचे गोळे सिद्ध होऊन ते खाली पडत असल्याचे लक्षात येणे
    ते तीन देव निघून गेल्यावर काही वेळाने आकाश पूर्णपणे निळे झाले आणि ते जेथे अदृश्य झाले, तेथे चंदेरी रंगाचे चमकणारे कण गोलाकार फिरतांना दिसले. नंतर त्या कणांचा वर्षाव चालू झाला आणि वर्षाव होत असतांना त्या कणांचे मिळून गोळे सिद्ध होऊन ते खाली पडत होते. ते गोळे एवढे मृदू होते की, त्यांना हात लावला, तर ते फुटून जातील.
४. आश्रमाच्या बाहेर तीव्र आपत्काळ असतांना रामनाथी आश्रमात
भावसोहळा चालू असून सर्व जण आनंदात असल्याचे दिसणे
    नंतर आम्ही रामनाथी आश्रमात होतो. आश्रमात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून साधक आले होते आणि तेथे भावसोहळा चालू होता. आश्रमाच्या बाहेर फार मोठा पाऊस पडत होता. तो तीव्र आपत्काळच होता आणि आश्रमात मात्र साधकांचे रक्षण होत होते. आश्रमात जेथे भावसोहळा चालू होता, तेथे समोरच श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि त्यांची गुरुपरंपरा एका ओळीत साधकांसमोर बसलेली दिसली. सगळे जण आनंदात होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोन साधिका करत होत्या. त्यांपैकी एक साधिका कर्नाटकातील कु. नागमणी आचार ही होती.
    हे स्वप्न संपल्यानंतर जेव्हा मी जागी झाले, तेव्हा मला शांत वाटत होते. पूर्वी मी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत झोपत होते, तेव्हा उठल्यावर मला चांगले वाटत नव्हते; पण त्या दिवशी ११ वाजता उठूनही मला चांगले वाटत होते.
- कु. मनीषा माहुर, देहली (८.९.२०१५)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn