Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘श्री ज्ञानेश्‍वरी’ची ४२५ वर्षांपूर्वीची मराठी हस्तलिखितातील दुर्मिळ प्रत उपलब्ध !

     पुणे, ४ डिसेंबर - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांची सेवा करण्याच्या उद्देशातून पंढरपूर येथील प्रल्हाद महाराज बडवे यांचे होळकर संस्थानातील शिष्य रामजी यांनी ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ लिहिली होती. ४२५ वर्षांपूर्वीची मराठी हस्तलिखितातील ही दुर्मिळ प्रत येथील डेक्कन महाविद्यालयातील अमेरिकन इन्स्टिट्यूटच्या मराठी हस्तलिखित केंद्रात उपलब्ध झाल्याची माहिती जुन्या हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.
वा. ल. मंजूळ पुढे म्हणाले की...
१. रामजी यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांची सेवा म्हणून ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरीनंतर लिहिलेली ही पहिलीच हस्तलिखित प्रत आहे. रामजी यांचा कालखंड हा नाथकालीन आहे. संत एकनाथ महाराज यांच्या काळातच ही प्रत लिहिली जाण्याचा योग साधला गेला आहे.
२. शके १६१४ ते १६१६ म्हणजेच इसवी सन १६९२ ते १६९४ अशी २ वर्षे रामजी यांनी अजानवृक्षाखाली बसून ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथ लिहिला. जो सध्या सर्वांत जुन्या ग्रंथांपैकी एक मानला जातो. ही प्रत पंढरपूर येथील होळकर वाड्यात वसंतराव बोरखेडकर-बडवे यांनी जतन केली आहे. 
३. मूळ श्री ज्ञानेश्‍वरीतील मंगलाचरण आणि हस्तलिखितातील मंगलाचरण यांमध्ये पाठभेद आहेत. मूळ ज्ञानेश्‍वरीमध्ये ‘नमोजी आद्या’ असे आहे, तर रामजी यांच्या ज्ञानेश्‍वरीमध्ये ‘नमोश्री आद्या’ असे आहे. ज्ञानेश्‍वरीमध्ये ‘जय जय स्वसंवेद्या’ असे असले, तरी रामजी यांच्या प्रतीमध्ये ‘जय स्वसंवेद्या’ असे आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn