Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विधानसभेचे कामकाज ३ वेळा स्थगित !

पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ! 
अशा स्थगितीमुळे जनतेच्या होणार्‍या हानीस
उत्तरदायी कोण ? वारंवार होणारी कामकाजाची स्थगिती
ही 'हिंदु राष्ट्रा'ची (सनातन धर्म राज्य) अपरिहार्यता दर्शवते !
 
     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकार्‍यांवर दबाव टाकून काँग्रेस उमेदवाराचे आवेदन रहित करण्यास सांगितल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. सतत तीन वेळा विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांच्या समोरील मोकळ्या हौदात जाऊन विरोधी सदस्यांनी घोषणा देऊन ही मागणी रेटून धरली. त्यामुळे श्री. बागडे यांनी तीन वेळा २० ते ३० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित केले. (विधानसभेचे कामकाज वारंवार स्थगित करून लक्षावधी रुपयांची हानी करणार्‍या विरोधी पक्षातील आमदारांकडून झालेली हानीभरपाई वसूल करणारे राज्यकर्ते हवेत ! - संपादक) 

     सभागृहात कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार वड्डेटीवार म्हणाले की, जानकर यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करू नये. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, जानकर यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी जानकर यांना त्वरित नोटीस पाठवली पाहिजे, अशी मागणी केली. 
  मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी 
शिवसेना आमदारांचे भगवे फेटे बांधून विधानसभेत आगमन !
     शिवसेनेचे आमदार सर्वश्री राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असल्याने यावर प्रथम चर्चा करावी. मराठा आरक्षण हा विषय गंभीर असल्याने अधिवेशनात कोणतेही कामकाज न करता या विषयावर शासनाने 'विशेष अधिवशन' घ्यावे. मराठा आरक्षण आणि मोर्चा यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून सभागृहात आले होते. यावर आक्षेप घेऊन टीका करतांना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, शिवसेनेने हा मोर्चा 'साजरा' करण्याचे कारण नाही. हे सत्तेत असून विरोध करतात. हे 'इव्हेंट मॅनजेमेंट'चे शासन आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn