Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इंडियन मुजाहिद्दीनपेक्षा मुसलमान युवकांना आकर्षित करण्याचा ‘इसिस’चा वेग अधिक ! - आतंकवादविरोधी पथक

आतंकवादविरोधी पथक यांना रोखण्यासाठी काय करणार कि त्यांचे ‘प्रबोधन’ करून सोडून देणार ?
      मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) - ‘इसिस’कडून इंटरनेटचा प्रभावी वापर करून मुसलमान युवकांना आतंकवादी कारवायांकडे पद्धतशीरपणे आकर्षित करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. इंटरनेटवरील संकेतस्थळ बंद केले तरी दुसर्‍या संकेतस्थळाची निर्मिती केली गेली आहे. ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) किंवा इंडियन मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनांना मुसलमान युवकांना आकर्षित करण्यासाठी ९ - १० मास इतका कालावधी लागत होता; मात्र इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया म्हणजेच ‘इसिस’ला मुसलमान युवकाला आकर्षित करण्यासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी लागत आहे, अशी माहिती राज्याच्या आतंकवादीविरोधी विभागाकडून चालू असलेल्या अन्वेषणात उघड झाले आहे.      मुंबई, पुणे यांसह नांदेड, परभणी, बीड, मालेगाव, धुळे, सोलापूर या ठिकाणी ‘इसिस’चा जोर आहे. ‘इंटरनेट’चा वापर करून चालू असलेले हे प्रकार थांबवणे कठीण झाले आहे. इंटरनेटवरील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या तरुण अभियंत्यांचे साहाय्य घेण्यात येत आहे. आतापर्यंत १४ संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. यासह विविध
    संकेतस्थळांवरील साडेतीनशेहून अधिक ध्वनीचित्रफितीही बंद करण्यात आल्या आहेत. युवक वाममार्गाने जाऊ नयेत, याची काळजी घेतली जात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn