Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वीजदेयक न भरल्याने जिजाऊंच्या समाधीस्थळाची वीजजोडणी दुसर्‍यांदा तोडली !

ऐतिहासिक वारशांविषयी उदासीन असलेल्या वनविभागाचा भोंगळ कारभार !
     महाड - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील जिजामातांची समाधीची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. वनविभागाने गेले चार मास विजेचे देयक न भरल्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांनी येथील वीजजोडणी दुसर्‍यांदा तोडली आहे. 
   राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे शासनाचे होणारे सततचे दुर्लक्ष, तसेच शिवपर्यटकांना सोयी-सुविधा पुरवण्यात शासनाला येणारे अपयश या पार्श्‍वभूमीवर पाचाड ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ग्रामस्थ म्हणाले, ‘‘या परिसरात रात्री संपूर्ण काळोखाचे साम्राज्य पसरत आहे. परिसराच्या उद्यानातील झाडे उन्हामुळे करपून गेली आहेत. शासनाला या समाधीची देखभाल करणे परवडत नसेल, तर या समाधीची देखभाल करण्याचे दायित्व पाचाड ग्रामस्थ स्वीकारण्यास सिद्ध आहेत. येथील धर्मशाळेच्या देखभाल दुरुस्तीकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या समस्यांवर आठ दिवसांत तोडगा काढला गेला नाही, तर पाचाड ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn