Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सरकारने नोटाबंदीसह आता अन्य समस्या सोडवण्यासाठीही कृती करावी !

     नोटाबंदीच्या क्रांतीकारी निर्णयानंतर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २२.११.२०१६ या दिवशी भाजपच्या संसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत व्यवस्था सुधारण्यासाठीची ही शेवटची कारवाई नाही, असे स्पष्ट केले. गोरगरिबांच्या कल्याणासाठी समर्पित झालेले मोदी सरकार प्रसंगी याहून कठोर निर्णयही घेऊ शकतात. यावरून नव्या वर्षात नव्या भारताची निर्मिती करण्याचा मोदी यांचा संकल्प आहे, असेे जाणवते. आता मोदी सरकारचा पुढील क्रांतीकारी निर्णय कोणता असेल, हे माहीत नाही; पण सरकार भविष्यात पुढील काही सूत्रांवर सकारात्मक विचार करील का ?,
१. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, सुदान इत्यादी देशांतून कोट्यवधींच्या संख्येने भारतात घुसलेल्या घुसखोरांपासून देशाला केव्हा मुक्ती मिळेल ? कारण यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुष्कळ मोठा आघात होत आहे. विविध अपराध आणि आतंकवादी कटांमध्ये त्यांचा सहभाग आढळतो.
२. काश्मीरमधील विघटनवादी आणि तेथील जनतेसाठी केंद्रशासन वर्षानुवर्षे जो विशेष आर्थिक निधी देत आहे, त्यामुळे देशाला कोणता लाभ होत आहे का ?
३. राष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाला बिघडवणारा अल्पसंख्यांक आयोग आणि मंत्रालय यांमुळे इतर समाजातील गरीब बहुसंख्य गरीब दुखावले जात नाहीत का ?
४. सध्याच्या शासन-प्रशासन यांमधील अधिकारी, खासदार आणि आमदार यांना मिळणार्‍या सुखसुविधांसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा होऊ शकते का ?
५. शासकीय कार्यालयामंध्ये सुविधा शुल्क घेऊन काम करण्याची प्रवृत्ती बंद होईल का ?
६. माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार इत्यादींच्या प्रीव्हीपर्स विषयी सुधारणा शक्य आहेत का ?
७. कोट्यवधी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवृत्तीवेतन धोरणात योग्य पालट होईल का ?
८. वेगवेगळ्या कारागृहास बंदिस्त आतंकवादी आणि अपराधी यांचा वाढता भार हा चिंतेचा विषय नाही का ?
९. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणवणार्‍या क्रिकेटमध्ये काळ्या पैशांतून चालणारी सट्टेबाजी रोखता येईल का ?
     या व्यतिरिक्त आणखी बरेच प्रश्‍न आहेत, ज्यावर सरकारकडून उपाययोजना अपेक्षित आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे निःसंशयपणे एक सशक्त आणि कुशल प्रशासक आहेत. त्यांचे राष्ट्राप्रतीचे समर्पण अद्भुत आहे. त्यांचा दूरदृष्टीपणा हा त्यांच्याकडून घेतल्या जाणार्‍या कठोर आणि परिणामकारी निर्णयांमधून दिसतो. नोटाबंदीच्या क्रांतीकारी निर्णयामुळे देशात दशकांनुदशके चालत आलेल्या भ्रष्टाचारी व्यवस्थेसाठी उत्तरदायी असणारे राजकीय नेते, अधिकारी, कर्मचारी, श्रीमंत, उद्योगपती आणि व्यापारी यांच्या जाळ्यावर मोठा प्रहार झाला आहे. त्यासमवेतच आतंकवाद्यांचे आर्थिक स्रोत असलेल्या बनावट नोटा, मादक पदार्थ आणि अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार यांवरही अंकुश आला आहे. त्यामुळे आतंकवाद आणि भ्रष्टाचार यांपासून मुक्त भारताच्या निर्मितीसाठी भारतियांनी या अघोषित आर्थिक आपत्काळात थोडासा संयम ठेवला पाहिजे. एखाद्या जुनाट आजारावरील उपचारांसाठी कधीकधी शस्त्रकर्म करण्याचीही आवश्यकता असते.
- श्री. विनोदकुमार सर्वोदय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn