Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळावे, याविषयीची लक्षवेधी सूचना सभापतींनी राखून ठेवली !

विधीमंडळाच्या कामात अडथळा आणणारे 
लोकप्रतिनिधी हे लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करतात !
     नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - विधान परिषदेमध्ये ९ डिसेंबर या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान मिळावे, यांसाठी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले की, जानेवारी अखेरपर्यंत शेतकर्‍यांना कांद्याचे अनुदान देण्यात येईल. 
    मुंडे यांनी यावर सांगितले की, शेतकर्‍यांना देण्यात येणारे अनुदान मिळण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला १२ वेळा पत्राद्वारे आठवण करूनही राज्य सरकारने तसा प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले; परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांना हे उत्तर न पटल्याने गोंधळ वाढल्याने सभापतींनी वरील निर्णय घोषित केला. यानंतर सभा २० मिनिटे स्थगित करूनही घोषणाबाजी झाली. नागपूर येथील ‘मिहान सेझ’ प्रकल्पामध्ये पतंजली समूहाला २५ लक्ष प्रतिहेक्टर दराने भूमी दिली. यामध्येही सरकारने भ्रष्टाचार केला असून पारदर्शी कारभार केला नाही, तसेच या प्रकरणी सरकारचे कोट्यवधी रुपयांची हानी झाले आहे, अशी विविध सूत्रे विरोधी पक्षांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाकडून दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान होत नाही, हे पाहून सभापतींनी ही लक्षवेधी राखून ठेवली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn