Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सद्गुरु राजेंद्रदादा यांना कु. शुभांगी आचार्य यांनी लिहिलेले कृतज्ञतापत्र !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार !
१. सद्गुरु दादा, तुम्हाला पत्र लिहावे, अशी पुष्कळ इच्छा असल्याने हे पत्र लिहित आहे. दादा, माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे तुमचे कपडे धुण्याच्या सेवेला मी आज येऊ शकले नाही, यासाठी मला क्षमा करा. 
२. महाप्रसाद घेतांना अकस्मात् सद्गुरु दादांना 
पाहून भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागणे 
     दादा, महाप्रसाद घेतांना तुम्हाला बघितल्यावर माझी भावजागृती झाली. मी जेवायची थांबले आणि माझे डोळे आपोआप मिटले जाऊन डोळ्यांसमोर तुम्ही हसतांना दिसू लागलात. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले; परंतु नंतर माझी व्याकुळता एवढी वाढली की, मला रडायलाच येऊ लागले. गुरुपौर्णिमेला तुम्ही ‘सद्गुरुपदी’ आरुढ झालात. त्या भावसोहळ्याचे दृश्य डोळ्यांसमोर दिसू लागले आणि माझ्या डोळ्यांतून अधिक वेगाने भावाश्रू वाहू लागले. ही अवस्था २० मिनिटे टिकून होती. त्या वेळी मला ‘तुमच्या चरणांजवळ बसावे’, असे वाटत होते. काही क्षणांतच ‘मी तुमच्या चरणांजवळच बसले आहे’, असे जाणवत होते. माझी व्याकुळता मात्र थांबत नव्हती. काही वेळाने मन शांत होऊन अश्रू आणि डोळेही थंड झाल्याचे जाणवले. आपल्या कृपेनेच मला ही अनुभूती आली; म्हणून मी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
३. पितृतुल्य सद्गुरुदादा ! 
      मी आश्रमात आल्यापासून तुम्ही मला भरभरून प्रेम दिलेत आणि त्याच प्रेमाने मला चुकांपासून सावरलेत, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. दादा, तुम्ही आम्हा सर्व साधकांचे सद्गुरु आणि आध्यात्मिक पिताही आहात. श्रीगुरुदेवांच्या कृपेमुळे तुम्ही देवद आश्रमाला लाभला आहात आणि आम्हाला तुमची आवश्यकताही आहे. 
    दादा, तुम्ही सद्गुरु झालात आणि श्रीगुरुदेवांनी आम्हाला आनंदाची पर्वणी दिली. यासाठी देवाच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. दादा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मलाही तुमच्याविषयी सांगायचे होते; परंतु कार्यक्रम अल्प वेळ होता आणि पुष्कळ साधक प्रतिक्षेत उभे होते. आज जो आनंद मला मिळाला आहे, तो सर्व साधकांनाही मिळणार आहे; कारण ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, असे देव म्हणतो. 
पत्र पुष्कळ मोठे लिहिले गेल्याने साधिकेला वाटलेली खंत आणि तिने व्यक्त केलेली कृतज्ञता !
     दादा, मला क्षमा करा. तुमच्या आज्ञेने पत्र लिहिले; पण ते पुष्कळ मोठे लिहिले गेले. तुमचा पत्र वाचण्यात पुष्कळ वेळ आणि समष्टी सेवेचे अमूल्य क्षण वाया जातील, यासाठी मी क्षमायाचना करते.
     दादा, पत्र मोठे आहे; पण काय करू ? किती सांगू ? श्रीगुरुमाऊलीची आणि आपली आठवण याहूनही पुष्कळ मोठी आहे. ‘पत्र वाचतांना आपला किती वेळ वाया गेला’, हे तुम्ही मला अधिकाराने सांगा, म्हणजे मी त्यावर तेवढा वेळ अधिक सेवा करण्याचे प्रायश्‍चित्त घेईन. या अपराधी जिवाला तुमचा अमूल्य वेळ घेण्याचा अधिकार नाही; म्हणून मला क्षमा करा. 
     दादा, पत्र लिहितांना माझ्या असंख्य चुका झाल्या आहेत. तसेच पत्र वाचतांना तुम्हाला पुष्कळ त्रासही होईल; पण मी काय करू ? तुमच्या आठवणींची मला ओढ लागली होती. दादा, तुम्ही मला विचारता, ‘ताई, भाववृद्धीसाठी काय प्रयत्न करता ? अनुसंधानात रहाता का ?’ मला अनुसंधान म्हणजे काय ? हे ठाऊकही नव्हते; परंतु ही देवाची लीला तुम्हीच मला शिकवून अनुभवायलाही दिली. आज या पत्राच्या माध्यमातून तुमच्याशी बोलण्याची संधी देवाने मला दिली; म्हणून देवाच्या चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे. 
तुमची कृपाभिलाषी,
- कु. शुभांगी आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.७.२०१६)
या सद्गुरुचरणांवर सर्व साधक । अनन्यभावे राहोत शरणागत ।
कु. शुभांगी आचार्य
     दादा, आज दुपारी मला ‘महाप्रसाद ग्रहण करावा’, असे वाटत नव्हते आणि तो जातही नव्हता. अकस्मात् तुम्ही मला समोर दिसलात. तेव्हा माझे मन व्याकुळ झाले. तुमच्याशी बोलल्यावर देवाने मला पुढील कविता सुचवली.
दादा आरुढ झालात आपण सद्गुरुपदावर ।
करतो प्रणाम आम्ही तव चरणांवर ॥ १ ॥

आता घेऊन जावे आम्हा साधकांशी । 
या साधनेच्या प्रगतीपथावरती ॥ २ ॥

पितृतुल्य प्रेम दिले आपण आम्हासी । 
नाही भासू दिलीत कधी उणीव 
मायेतील पित्याची ॥ ३ ॥

सहजच मन मोकळे होऊनी जाते आपल्याजवळी ।
निर्मळ मनाने अर्पण व्हावे 
हे पुष्प सद्गुरुचरणांवरी ॥ ४ ॥

उणे करूनी दोष आणि अहंभावासी । 
सद्गुणांचेही व्हावे सार्थक येऊन तव चरणांशी ॥ ५ ॥

सांगता स्थूलदेहाची मर्यादा, तेच हे रूप आपले सद्गुरुदादा ।
या चरणांवर आम्ही सर्व साधक 
अनन्यभावे राहोत शरणागत ॥ ६ ॥ 

- कु. शुभांगी आचार्य (२३.७.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn