Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेले स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया !

     सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या प्रकरणात साधकांना नाहक पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. तेव्हा पोलिसांचे ओरडून आणि अधिकारवाणीने बोलणे, तेच तेच प्रश्‍न विचारून साधकांना गोंधळात टाकणे आणि साधकांचा मानसिक छळ करणे, या अग्निदिव्याला साधक श्रीकृष्ण आणि श्रीगुरु यांच्या कृपेने कसे सामोरे गेले, याविषयी साधिकेला आलेले अनुभव आणि तिला शिकायला मिळाली सूत्रे येथे दिली आहेत. 
      हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत अनेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना पोलिसांच्या चौकशांना आणि छळांना सामोरे जावे लागेल. त्या वेळी ‘आपले मन स्थिर कसे ठेवायचे आणि भगवंताचे साहाय्य कसे मिळवायचे’, याची माहिती या लेखावरून होईल. यासाठी हा लेख संग्रही ठेवा आणि त्याचा अभ्यास करा.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
 १. पोलीस अधिकार्‍यांच्या प्रश्‍नांना सामोरे जातांना झालेले त्रास
१ अ. हाता-पायांतून शक्ती गेल्यासारखे होऊन दडपण येणे : ‘पोलिसांच्या संपर्कात आल्यावर प्रथम माझ्या हाता-पायांतून शक्ती गेल्यासारखे झाले. सूक्ष्मातून अनाहतचक्र आणि आज्ञाचक्र यांवर प्रचंड दाब अन् दडपण आले. या वेळी कृष्णानेच माझ्याकडून नामजप करवून घेतला. देवाचे चरण घट्ट पकडून ‘मी आपल्याला संपूर्ण शरण आले आहे. तुम्हीच माझ्याकडून तपासाच्या वेळी योग्य ते वदवून घ्या’, अशी प्रार्थना केली. 
१ आ. शारीरिक त्रास : पोलीस अधिकार्‍यांशी बोलतांना त्यांच्यातील रज-तम यांमुळे माझ्यावर वातावरणातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे झाली आणि मला थकवा येऊन सतत उलट्या होत होत्या. अनुसंधान जराही थांबले, तरी त्रास वाढत होता. पोटात काही नसल्याने कोरड्या उलट्या होत होत्या. भुकेची संवेदना नष्ट झाली. घशात काहीतरी विचित्र त्रास होत होता. डोके जड होऊन हात-पाय गळून गेले. चक्कर येत होती.
१ इ. मानसिक त्रास : अनावश्यक भीती, अस्थिरता आणि अस्वस्थता वाढली. पोलिसांमधील रज-तम मला घाबरवत होते. 
२. पोलीस चौकशीला सामोरे जातांना आलेले अनुभव 
२ अ. पोलिसांच्या डोळ्यांतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होऊन ती आज्ञा आणि अनाहत या चक्रांवर नियंत्रण ठेवत असल्याचे जाणवणे : पोलीस अधिकार्‍याच्या डोळ्यांतून प्रचंड वेगाने त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होऊन माझ्या आज्ञा आणि अनाहत या चक्रांवर नियंत्रण ठेवत असल्याचे मला जाणवले. ‘त्यांना अपेक्षित असे बोलून घेणे, असे त्यांचे नियोजन असावे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझे मन आणि बुद्धी यांवर आवरण येत गेले. 
२ आ. पोलिसांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना मनावर दडपण येऊन दाब जाणवणे आणि श्रीकृष्ण, गुरुदेव अन् महर्षि यांच्या आठवणीने दाब उणावून लगेच हलके वाटणे : ‘पुनःपुन्हा तेच तेच प्रश्‍न विचारून भंडावून सोडणे, गोंधळून टाकणे’, ही सूक्ष्म आणि स्थूल स्तरावरील नीती असून ‘त्यांचे शब्द माझे मन आणि बुद्धी यांवर आदळत होते’, असे मला जाणवले. त्यामुळे काही क्षण मनावर दडपण आणि दाब जाणवत होता; पण ‘श्रीकृष्ण, गुरुदेव आणि महर्षि समवेत आहेत. ते पाहून घेतील’, या विचारानेच दडपण आणि दाब उणावून लगेच हलके वाटत होते. 
२ इ. पोलिसांच्या सतत प्रश्‍न विचारण्याने थकवा येऊन दमायला होणे; पण मन आनंदी आणि सतर्क रहाणे : सतत शरणागती आणि प्रार्थना यांमुळे मी अन् माझे सहसाधक यांचे मन आणि बुद्धी यांवरील आवरण प्रचंड वेगाने दूर होत होते. ते देवच करत होता. ‘अनिष्ट शक्तींचे आक्रमण होणे आणि ते परतवून लावणे’, ही प्रक्रिया चालूच होती. यामध्ये स्थुलातून पोलिसांचे चिकाटीने प्रश्‍न विचारून, ओरडून कात्रीत पकडणे, दबाव आणणे, अपेक्षित ते वदवून घेण्यासाठीचे प्रयत्न चालूच होते. या सूक्ष्मातील प्रक्रियेमुळे मला थकवा येऊन दमायला झाले; पण मन आनंदी आणि सतर्क होते. 
३. प्रार्थना केल्यावर झालेले पालट
३ अ. प्रार्थना केल्यावर श्रीकृष्णाने मनोदेहाभोवती आलेली भीतीयुक्त स्पंदने नष्ट करणे : मला एक पोलीस अधिकारी ओरडला. तेव्हा भीतीची नकारात्मक स्पंदने काळ्या आवरणासहित मनोदेहाभोवती गोळा झाल्याचे जाणवले. श्रीकृष्णाला ‘तुला अपेक्षित असे तूच बोलून घे’, अशी शरणागत भावाने प्रार्थना झाली आणि श्रीकृष्णाने मनोदेहाभोवतीची भीतीयुक्त स्पंदने दूर केली. 
३ आ. वाईट शक्तीने स्थुलातून दबाव आणण्याचा प्रयत्न करणे आणि कृष्णाला प्रार्थना केल्यावर त्याचा परिणाम न होणे : पोलिसांमधील रज-तम माझ्यावर सूक्ष्मातून आक्रमण करून दबाव आणू पहात होते. ‘श्रीकृष्णा, नाम आणि चैतन्य यांची शक्ती माझ्या मन आणि बुद्धीभोवती राहू दे अन् समोरच्या रज-तमाकडून येणार्‍या अनिष्ट शक्तीच्या आवरणाचा माझ्यावर परिणाम होऊ देऊ नकोस’, अशी प्रार्थना केल्यावर कर्ता करविता कृष्णच असल्याची अनुभूती घेता आली.
३ इ. महर्षींची आठवण होऊन त्यांना प्रार्थना करताच स्वतःसमवेत सहसाधकाचे मन आणि बुद्धी यांवरील अनिष्ट शक्तीचे आवरण दूर झाल्याचे जाणवणे : मध्येच अचानक मला महर्षींची आठवण होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि त्यांना प्रार्थना झाली, ‘आम्हा सर्व साधकांचे रक्षण तुम्हीच करणार आहात.’ त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होताच ‘माझे आणि माझ्यासमवेत असलेले सहसाधक डॉ. कुलकर्णी यांचे मन आणि बुद्धी यांवरील अनिष्ट शक्तीचे आवरण दूर झाले’, असे मला जाणवले. 
३ ई. प्रार्थना केल्यावर बोलण्यासाठी योग्य वेळी योग्य शब्द सुचणे : त्या कालावधीत काही वेळा नामजप अल्प व्हायचा; परंतु ‘देव समवेत आहे’, असा भाव आणि ‘तूच पहा’, अशी चरण पकडून केलेली प्रार्थनाच योग्य ती उत्तरे सुचवत होती, उदा. ‘वहीची पाने अर्धवट कशी फाडली ? येथे काही नोंदी होत्या का ? लपवल्या का ?’ असे त्यांनी विचारले. तेव्हा मी पूर्णपणे विचाररहित झाले; परंतु देवाने सुचवले, तसे माझ्याकडून बोलले गेले. मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्या मुलीने वापरून झालेल्या वह्या आरंभीची काही पाने फाडून आम्ही वापरतो.’’ प्रत्यक्षातही ते खरेच होते; पण मला जे बोलायला सुचत नव्हते, ते देवाने सुचवले. 
३ उ. प्रार्थना करून दिलेल्या उत्तरांमुळे पोलिसांमध्ये गोंधळ निर्माण होणे : ‘देवा, आमच्या माध्यमातून तूच उत्तर दे’, अशी प्रार्थना करताच ओरडून प्रश्‍न विचारणार्‍या अधिकार्‍याला ‘पुढे काय विचारावे’, याचे भान रहात नव्हतेे. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना देवच उत्तरे देत असल्याने त्यातून येणारे चैतन्य आणि चैतन्यरूपी देवाचा आशीर्वाद यांमुळे पोलिसांमध्ये गोंधळ निर्माण व्हायचा अन् ते शांत होत. काही वेळाने पोलीस अधिकार्‍यांनी विचारले, ‘‘तुम्ही १० वर्षांपासून येथे आहात, तर आम्हाला येथे काय चालते, ते खरे सांगा. तुमच्याशी आमचे वैयक्तिक काही भांडण नाही.’’ त्या वेळी माझ्याकडून देवाला कळकळीने प्रार्थना झाली, ‘देवा तूच सुचव, तूच बोलून घे.’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी डॉक्टर नाही. मला बाकी काही ठाऊक नाही. मी डॉक्टर सांगतात, तसे त्यांच्या सल्ल्याने करते.’’
     मी असेच उत्तर कायम ठामपणे सांगत होते, तर पोलीस ‘तेच तेच किती वेळा सांगता. दुसरी माहिती द्या’, असे ओरडून सांगत होते. तेव्हा ‘त्यांच्याकडून माझ्यावर स्थुलातून आणि सूक्ष्मातून दबाव आणला जात होता’, असे मला जाणवले.
३ ऊ. पोलीस अधिकार्‍याच्या डोळ्यांतून त्रासदायक शक्ती बाहेर पडत होती. तेव्हा प्रार्थना करताच त्यांचे डोळे चुरचुरू लागले.
४. आश्रमातील चैतन्यामुळे पोलीस हतबल होणे
४ अ. आश्रमातील चैतन्यामुळे पोलिसांचा गोंधळ उडणे आणि त्यांना सुचेनासे होणे : पोलीस आणि अधिकारी यांंना आश्रमातील चैतन्याचा त्रास होत होता. त्यांना न सुचणे, पूर्णपणे ‘ब्लॅन्क’ होणे, अंग दुखणे, अस्थिरता येणे अशा प्रकारचे त्रास होत होते. त्यामुळे काही वेळा प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित असे त्यांच्याकडून बोलले किंवा विचारले न जाता, देवाला अपेक्षित असे सर्व होत गेले. त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला. काय करायचे, ते त्यांना कळतच नव्हते.
४ आ. पोलिसांना आकलन होत नसल्याचे जाणवणे : पंचनामा करतांना ते तो पुनःपुन्हा पहात होते. त्यांना ‘प्रत्यक्षात आपण काय लिहिले’, याचे आकलन होत नव्हते. एकाला जमत नाही; म्हणून अधिकार्‍याने अनेक जणांना बोलावून ‘पंचनामा योग्य पद्धतीने लिहिला आहे कि नाही ?’, याची निश्‍चिती केली; परंतु ‘चैतन्याने सर्वांनाच सळो कि पळो करून सोडले होते’, असे मला जाणवले. हे पहातांना मला देवाच्या कृपेची गंमत वाटून आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. 
४ इ. पोलिसांमधील रज-तमात्मक आवरण ढवळून निघत असल्याचे जाणवणे : पोलीस आम्हाला अडकवायला आले होते; पण त्यांना चैतन्याने न्हाऊ घातले. त्यांच्यातील रज-तमात्मक आवरण ढवळून निघत होते. आश्रमातील संत, समष्टी नामजप, आश्रमातील चैतन्य हे सर्व वातावरणातील सूक्ष्म अनिष्ट शक्तींशी सतत लढत होते. 
४ ई. पोलिसांची आक्रमकता न्यून झाल्याचे जाणवणे : आश्रमात सूक्ष्मातून युद्धच चालू असून त्यामध्ये ‘पोलिसांमधील रज-तम होरपळून निघत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे काही काळ प्रश्‍न विचारण्याचा आणि ओरडून दबाब आणण्याचा प्रयत्न शांत झाला. नंतर ‘त्यांच्यातील रज-तम संपुष्टात आले’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात ते सर्व गळून गेले होते. नंतर त्यातील अधिकारी म्हणाले, ‘‘मला बरे वाटत नाही.’’ 
४ उ. पोलीस अस्थिर आणि अस्वस्थ मानसिकतेत वावरत असणे : ‘काहीतरी करून सनातन संस्थेला कसे अडकवता येईल’, या विचाराने ते पछाडले होते. त्यातील काही जण रज-तमाच्या कह्यात असल्याने त्यांना खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. ते अस्थिर आणि अस्वस्थ वाटत होते.
४ ऊ. पोलिसांना काही सुचेनासे होणे : एकंदरीत आश्रमातील चैतन्याने पोलिसांची गोंधळल्यासारखी आणि भ्रमिष्टासारखी स्थिती होऊन ते अनावश्यक बसून होते. ‘एकाला सुचत नव्हते, तर दुसर्‍याला विचारल्यानंतर तो तिसर्‍याला विचारत असे. असे पहाटेपर्यंत चालू होते. ते अनेक लहान लहान गोष्टी पुनःपुन्हा पहात होते. 
५. पोलीस चौकशीच्या वेळी केलेल्या प्रार्थना
     ‘देवा, या सूक्ष्मातील युद्धात सर्व साधकांचे रक्षण कर. आश्रमातील वस्तूंभोवती संरक्षककवच निर्माण कर. सर्वांकडून योग्य ते बोलून घे. पोलिसांना खोटा आळ आणता येऊ नये, तसेच सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होऊ दे’, अशा समष्टी प्रार्थना करवून घेतल्या. 
- सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn