Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘सनबर्न फेस्टिव्हल’ची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल ! - मुुख्यमंत्री

     नागपूर (वार्ता.) - सनबर्न महोत्सवाविषयी माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ डिसेंबर या दिवशी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. ‘पुणे येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमात अश्‍लीलता आहे, तसेच तेथे अमली पदार्थांचे सेवन केेले जाते त्यामुळे या महोत्सवावर बंदी घालणार का ?’, असा प्रश्‍न सनातन प्रभातच्या वार्ताहराने विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
     शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला असून ‘शेतकरी सक्षम झाल्यावरच शासन कर्जमाफी देईल’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशनात भरीव कामकाज झाले असून सर्वाधिक २७ विधेयके सादर झाली. त्यांपैकी दोन्ही सभागृहांत २३ विधेयके संमत झाली आहेत, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
महाराष्ट्रातही ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ हा कायदा लागू केला जाईल !
     ‘कर्नाटक राज्याप्रमाणे ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ हा कायदा महाराष्ट्रात लागू नसल्याने महाराष्ट्रातील रुग्णालयांकडून रुग्णांची लुबाडणूक केली जात आहे. हा कायदा महाराष्ट्रात कधी लागू करणार ?’, असा प्रश्‍नही सनातन प्रभातच्या वार्ताहराने विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘चौकशी करून हा कायदा लागू केला जाईल.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn