Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) पाकने पोरखेळ चालू ठेवला, तर त्याचे १० तुकडे होतील ! - राजनाथ सिंह

पाक प्रतिदिन भारतीय सैनिकांना ठार करत असतांना त्याकडे पोरखेळ
समजून कडक कारवाई न करणारे सरकार देशाचे रक्षण कसे करणार ?
     पाकने अजून काय करायचे बाकी ठेवले आहे की, ज्यानंतर भारत पाकचे १० तुकडे करील, हे सरकारने एकदाचे घोषित करावे, म्हणजे जनता पुन:पुन्हा पाकला धडा शिकवण्याविषयी विचारणा करणार नाही !      जम्मू - भारताला युद्धात पराजित करणे कठीण आहे, हे पाकला समजले आहे. कारगील युद्धाच्या वेळीही पाकला पराजित व्हावे लागले होते. तरीही पाक भेकडाप्रमाणे आक्रमणे करत आहे. पाकचेे आतापर्यंत केवळ दोनच तुकडे पडले आहेत. त्याचा पोरखेळ असाच चालू राहिला, तर त्याचे १० तुकडे होतील, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे दिली. हुतात्मादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंह बोलत होते.
राजनाथ सिंह यांनी केलेली विधाने १. धर्माच्या नावावर भारतियांमध्ये फूट पाडण्याचे स्वप्न पाक पहात आहे; पण त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. (भारतात धर्माच्या नावावर एकी नाही, हे राजनाथ सिंह यांना ठाऊक नाही का ? भारतातील धर्मांध अल्पसंख्यांक आतंकवाद्यांना साहाय्य करतात, हे काश्मीरसह देशभरामध्ये वारंवार घडत आहे, हे देशातील जनता जाणते ! - संपादक) २. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले होते. पाकशी हृदयापासून नाते जोडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच वेळी आमची भावना पाकने समजून घ्यायला हवी होती; पण त्यांना ते समजले नाही. त्यानंतरही शिष्टाचार बाजूला ठेवत मोदी लाहोरला आले; पण पाकच्या नापाक कारवाया चालूच राहिल्या. (पाकचा इतिहास माहिती नसणार्‍यांनी त्यांना हृदयाशी जोडण्याचा प्रयत्न केला असता, तर एक वेळ मान्य करता आले असते; पण ज्यांना त्याचा इतिहास माहिती आहे, तेही जेव्हा असा मूर्खपणा करतात, तेव्हा जनतेला संताप येतो ! - संपादक) ३. आतंकवादाच्या बळावर जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा पाकचा डाव आहे. आतंकवाद हे मर्दुमकीचे काम नसून भेकडाचे काम आहे. (आतंकवादाला मुळासकट नष्ट न करणे आणि सैनिकांना नाहक हुतात्मा होऊ देणे, हेही मर्दुमकीचे काम नाही, हेही लक्षात घ्यायला हवे ! - संपादक) ४. पाकिस्तान भारताचाच भाग होता. आजही आम्ही त्यांना वेगळे मानत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही गोळी झाडत नाही. आम्ही नेहमीच पाककडे मैत्रीचा हात पुढे केला; पण तरीही पाकची आक्रमणे करायची खूमखूमी काही जात नाही. (गांधी-नेहरूंच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रघातकी विचारांनी चालणारे राजनाथ सिंह ! पाकवर वेळीच कारवाई न केल्यास भारताचे इस्लामीस्तान व्हायला वेळ लागणार नाही ! - संपादक) मैत्रीच्या ऐवजी पाकने ऊरी आणि पठाणकोट येथे आक्रमणे करत युद्घ विरामाचे उल्लंघन केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn