Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सॉलोमन बेटाला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का !

     नवी देहली - ९ डिसेंबरला पहाटे दक्षिण अमेरिका खंडाजवळ असणार्‍या सॉलोमन बेटाच्या किनारपट्टीला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. यात जीवित आणि वित्त हानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सॉलोमन, वानुआतु, पापुआ न्यू गिनी, नोरू, न्यू सेलेडोनिया, तुवालू आणि कोसरी या बेटांच्या किनारपट्टीला सुनामीचा धोका असल्याचे म्हटले गेले आहे. सॉलोमन बेट हा पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेस मेलानेसिया येथे सुमारे १ सहस्र बेटांनी बनलेला देश आहे. सुमारे २८ सहस्र ४०० चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या देशाची राजधानी गुवाडलकॅनाल बेटावरील होनिआरा ही आहे.
चीनच्या शिनच्यांगमध्ये भूकंप !
     चीनच्या शिनच्यांग वेवुर या प्रांतातील हूतूबी काउंटी येथे ८ डिसेंबरला दुपारी सवा वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (दक्षिण अमेरिका खंडाजवळ असणार्‍या सॉलोमन बेटाच्या किनारपट्टीला ७.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn