Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबईमध्ये २ मासांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लक्ष १० सहस्रांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी नीतीमत्तेचे शिक्षण देणे, हाच एकमेव उपाय !
      मुंबई, ४ डिसेंबर (वार्ता.) - वाहतूक नियमनाकरिता शहरातील ‘सिग्नल्स’वर आतापर्यंत ४ सहस्र ७१७ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे, पोलिसांना सुलभ झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या २ मासांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लक्ष १० सहस्रांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
    लाल सिग्नल असतांना वाहन पुढे नेणे, झेब्रा पट्टे ओलांडून वाहन पुढे थांबवणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राणाचा वापर न करणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माणसे वाहनात बसवणे, वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, तसेच चारचाकी वाहन चालवतांना आसनपट्टा न लावणे यांसारखे नियमबाह्य वर्तन करणार्‍या वाहनचालकांच्या वाहनांचे क्रमांक त्या नियंत्रण कक्षात असणार्‍या वाहतूक पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’मध्ये मुद्रित केले जातात. त्याच वेळी वाहनचालकाच्या भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचा लघुसंदेश पाठवला जातो. नियम मोडणार्‍या वाहनचालकाकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला जातो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn