Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे

     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - महिला बालकल्याण समितीच्या वतीने राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणू. तसेच ज्या सामाजिक संस्थांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले आहे, त्यांच्याकडूनही त्या मुलांविषयीचा तपशील मागवला आहे. त्याद्वारे त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सर्वेक्षण यांविषयी प्रश्‍न विचारला होता. त्याविषयी दिलेल्या लेखी उत्तरात तावडे यांनी सांगितले आहे की, जानेवारी २०१६ पर्यंत केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या ७४ सहस्र ९७१ शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी ५० सहस्र ६८२ विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला आहे. त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn