Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चक्रीवादळाने निर्माण झालेल्या आपत्काळातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता अधोरेखित होणे

      ‘चेन्नई किनारपट्टीवर २० वर्षांनंतर ‘वरदा’ हे मोठे चक्रीवादळ आले. या वादळामुळे वीजपुरवठा खंडित होणे, वृक्ष उन्मळून पडून रस्त्यावरील वाहतूक ठप्प होणे इत्यादी अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. साध्या अडचणीच्या काळातही सामान्यपणे समोरच्या व्यक्तीला काही साहाय्य हवे असल्यास आपण ते लगेच करतो. असे करणे हे आपण ‘मनुष्य’ असल्याचे लक्षण आहे; परंतु चक्रीवादळाने निर्माण झालेल्या या आपत्काळात मानवतेला काळिमा फासणार्‍या अनेक घटना घडल्या. चक्रीवादळाने निर्माण झालेला आपत्काळ आणि त्याची तीव्रता अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता याबद्दलची माहिती पुढे दिली आहे.
१. ‘वरदा’ या चक्रीवादळाने निर्माण
झालेला आपत्काळ आणि त्याची तीव्रता
      ‘वरदा’ या चक्रीवादळात ताशी १२० किलोमीटर वेगाने वहाणार्‍या वार्‍यामुळे १०० ते १५० वर्षांपूर्वीचे जुने वृक्ष उन्मळून पडले होते. हे वृक्ष झोपड्या, तसेच गाड्यांवर पडून त्यांचीही हानी झाली. ३ - ४ दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यामुळे शाळांना सुट्टी दिली होती. ३ - ४ दिवस सर्व दुकाने आणि हॉटेल बंद होती. चक्रीवादळामुळे एअरटेल आणि वोडाफोन यांच्या इंटरनेट गतीवर परिणाम झाला. समुद्राखालील केबल्सची हानी झाली. एअरटेल आणि वोडाफोन यांच्या इंटरनेट सेवेवरही परिणाम झाला होता. पुढे काही दिवस इंटरनेटची गती न्यून होती.
२. आपत्काळात साहाय्य न करता अडलेल्याला आणखी अडचणीत टाकणारे काही प्रसंग
     काही ठिकाणी नळाला पाणी येत असतांनाही विजेचा पुरवठा बंद असल्याने टाकीत पाणी चढवता येत नव्हते. त्यामुळे काही लोक हॉटेलमध्येे रहायला गेले. त्यामुळे हॉटेलवाल्यांनी रहाण्याच्या खोल्यांचे भाडे वाढवले. चक्रीवादळामुळे दळणवळण यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून वस्तू विकल्या जात होत्या. ५५ रुपये प्रति लिटर किमतीचे दूध ८० रुपये प्रति लिटरने विकले जात होते. रिक्क्षावाले दुप्पट दर आकारत होते. विमानाचे भाडे अनेक पटींनी वाढले होते, उदा. विमानाच्या एका प्रवासासाठी एरव्हीचे भाडे २ सहस्र रुपये असतांना या काळात ४५ सहस्र रुपये भाडे आकारले होते. चक्रीवादळाने निर्माण झालेल्या या आपत्काळातच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांचे निधन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी बंद पाळला गेल्याने लोकांना घरात रहावे लागले. बँका (अधिकोष), एटीएम् बंद असल्याने मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना पुष्कळ अडचणी आल्या. त्यामुळे लोकांचे पुष्कळ हाल झाले.
३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता
     चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या आपत्काळात सर्वांनी एकमेकांना साहाय्य करण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंचे दर पुष्कळ पटींनी वाढवणे, लोक अडचणीत येतील अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाणेच झाले ! ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे.’
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn