Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कुशाग्र बुद्धीमत्तेची देणगी लाभलेली, पारितोषिकांची रक्कम आणि खाऊचे पैसे स्वत:हून अर्पण करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगलीतील कु. प्रणिता प्रशांत जोशी (वय १४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रणिता जोशी ही एक आहे !
कु. प्रणिता जोशी
     (कु. प्रणिताची वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. - संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. वय ५ ते ९ वर्षे
१ अ. कुशाग्र बुद्धीमत्ता : ‘तिला सलग इयत्ता पहिली ते नववीपर्यंत शाळेतील बौद्धिक स्पर्धांतील पारितोषिके मिळत होती.
१ आ. कर्मकांड आवडीने करणे : प्रणिता आमच्या घरी पूर्वापार चालत आलेल्या दैनंदिन सेवा, उदा. देवाला प्रतिदिन नैवेद्य दाखवणे, घराबाहेर घास ठेवणे आणि संध्याकाळी घरात ऊद घालणे आवडीने करते.
१ इ. धर्माचरणाची आवड : तिला बिनबाह्यांचे पोलके, घट्ट कपडे, ‘जीन्स’ वापरायला आवडत नाही. त्यामुळे शाळेत तिच्याकडे ‘एक नम्र मुलगी’ म्हणून पहातात.
१ ई. दैनिक सनातन प्रभात आवडणे : घरी दैनिक सनातन प्रभात आल्यावर ती तो आधी वाचते आणि नंतर पुढील कामे करते. 
१ उ. अन्यायाची चीड : अन्य वर्तमानपत्रांमध्ये सनातन संस्था किंवा साधक यांच्याविषयी चुकीचे काही छापून आले, तर तिला चीड येते.
१ ऊ. उपायांचे गांभीर्य : ती लहानपणापासून एका जागी बसून ३० ते ४० मिनिटे नामजप करते. शिकवणीला, शाळेत किंवा बाहेर जाण्यापूर्वी देवतांची चित्रे लावणे, अत्तर, उदबत्ती आणि कापूर यांचे उपाय करणे, हे सर्व नियमितपणे करते. शाळेत जातांना उपायांसाठी सोबत कापूर नेते.
१ ए. अर्पणाचे महत्त्व : तिला मिळालेली पारितोषिकांची रक्कम आणि खाऊचे पैसे ती प्रत्येक गुरुपौर्णिमेला अर्पण करते. 
१ ऐ. श्रीकृष्णावर श्रद्धा 
१ ऐ १. कर्तेपण श्रीकृष्णाला देणे : तिने चित्रकला, पोहणे, गाणे आदी अनेक कला लवकर आत्मसात केल्या आहेत. ती एकपाठी आहे. ‘या सर्व गोष्टी मी श्रीकृष्णामुळेच करू शकते’, असे ती म्हणते. 
१ ऐ २. प्रश्‍न आणि उत्तरपत्रिका यांवर कृष्णनामाचे मंडल घालणे : परीक्षेच्या वेळी प्रश्‍नपत्रिका सोडवण्यापूर्वी ती प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांवर सूक्ष्मातून कृष्णाच्या नामाचे मंडल काढते. नंतर प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करून ती सोडवायला आरंभ करते. 
२. वय ९ ते १२ वर्षे 
२ अ. सहनशीलता : एकदा शिकवणीहून घरी सायकलवर बसून येतांना तिच्या पायाला लागले आणि मोठी दुखापत झाली. ‘तिला पुष्कळ वेदना होत असतील’, असे आम्हाला वाटले; पण ती म्हणाली, ‘‘मला काही त्रास होत नाही. तुम्ही काळजी करू नका.’’
३. वय १२ ते १४ वर्षे 
३ अ. जिज्ञासू वृत्ती : तिच्यासाठी आम्हाला एक आध्यात्मिक उपाय करायला सांगितला होता. तिने मला त्याचे कारण विचारले; पण आम्ही तिला ते कळू दिले नाही. तेव्हा तिने संकेतस्थळावरून (‘वेबसाईट’वरून) त्याचे कारण शोधून काढले आणि मला म्हणाली, ‘‘आई, मला ते उपाय का करायला सांगितले, याचे उत्तर मिळाले. आता मी टाळाटाळ न करता ते श्रद्धापूर्वक करीन.’’
३ आ. ‘साधनेत असलेल्या आईने नातेवाईक किंवा शेजारी यांच्याशी चांगलेच वागायला हवे’, असे आईला परखडपणे सांगून चुकीची जाणीव करून देणे : काही कारणांनी एकदा माझ्या मनात आमचे नातेवाईक आणि शेजारी यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. मी प्रणिताला त्यांच्याविषयी सतत नकारात्मक सांगत होते. तेव्हा या चुकीची जाणीव तिने मला स्पष्टपणे करून दिली. ती म्हणाली, ‘‘तू साधना करत आहेस आणि ते साधना करत नाहीत. तूही जर त्यांच्यासारखीच वागत असशील, तर तुझ्यात आणि त्यांंच्यात काय भेद ? त्यांना जसे वागायचे, तसे वागू दे. तू नेहमी चांगलेच वागायला हवेस !’’
३ इ. सेवांत सहभाग : सध्या ती आणि तिची बहीण आळीपाळीने दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा नियमितपणे करतात. गुरुपौर्णिमा आणि हिंदु धर्मजागृती सभेच्या कालावधीत त्या प्रासंगिक सेवांत सहभागी होतात.
४. स्वभावदोष
     प्रणितामध्ये ‘आळस’, ‘निष्काळजीपणा’ आणि ‘चिडचिड करणे’ हे स्वभावदोष प्रबळ आहेत. यांपैकी ‘आळस आणि निष्काळजीपणा या स्वभावदोषांमुळे तुझी साधनेत हानी होणे, प.पू. डॉक्टरांना अपेक्षित नाही’, असे सांगून मी तिला या स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्रवृत्त करत आहे.’ 
- सौ. प्रतिक्षा प्रशांत जोशी (कु. प्रणिताची आई), वाटेगाव, सांगली. (४.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn