Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनबर्न रहित न केल्यास तीव्र आंदोलन करू ! - गजानन चिंचवडे, शिवसेना

हिंदु संस्कृतीवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
पिंपरी येथे सनबर्नच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     पिंपरी, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या पुणे शहरात सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. पुण्याची संस्कृती बिघडवणारा कार्यक्रम होऊ देणार नाही. शासनाने सनबर्न फेस्टिव्हल रहित केला नाही, तर केसनंद गावात आणि अन्य ठिकाणीही आम्ही तीव्र आंदोलन करू. भविष्यातही संस्कृतीला विघातक असे कोणतेही कार्यक्रम होत असतील, तर तेही होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य आणि शिवसेनेचे श्री. गजानन चिंचवडे यांनी केले. केसनंद (जिल्हा पुणे) येथे आयोजित केलेल्या सनबर्न फेस्टिव्हल कार्यक्रम तात्काळ रहित करावा, तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदींवरील अवैध भोंगे बंद करावेत, या मागण्यांसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १८ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
     या आंदोलनाला शिववंदना चळवळीचे श्री. उमेश पवार, शिवप्रतिष्ठानचे श्री. गणेश भुजबळ, अधिवक्ता श्री. पडवळेमामा, देहूरोड येथील धर्माभिमानी श्री. गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांसह १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.
     सनबर्न फेस्टिव्हलला गोव्यातून हाकलण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये तरुणांना अमली पदार्थ देऊन व्यसनाधीनतेकडे ढकलण्यात येते. अशा प्रकारचे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण पुण्यात चालणार नाही. एकीकडे श्री गणेशचतुर्थीला रात्री १० वाजता ध्वनीक्षेपक बंद करायला लावले जातात; पण सनबर्नसारख्या कार्यक्रमाला रात्री १२ वाजता आरंभ होतोे, हे कितपत योग्य ? सर्वांसाठी सारखेच कायदे पाहिजेत. जर हा कार्यक्रम थांबवला नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
मशिदींवरून ध्वनीप्रदूषण करणार्‍या अवैध भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे ! - अधिवक्ता श्री. पडवळेमामा
      शासनाकडून हिंदूंच्या सणाच्या वेळी आवाजाचे बंधन लादले जाते; परंतु इतर धर्मियांना वेळ आणि आवाज यांवर बंधन लादले जात नाही, हे चुकीचे आहे; म्हणून मशिदींवरून ध्वनीप्रदूषण करणार्‍या अवैध भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे, तसेच विद्येचे माहेरघर असणार्‍या पुणे शहरातून सनबर्नसारखे कार्यक्रम हाकलून लावले पाहिजेत.
भारत भोंगेमुक्त केला पाहिजे आणि सनबर्न
फेस्टिव्हलला भारतातून हाकलून लावले पाहिजे !
- श्री. अभिजीत देशमुख
      नागरिकांनी त्यांच्या भागातील मशिदींवर असलेल्या अवैध भोंग्यांच्या विरोधात कायदेशीररित्या तक्रार नोंदवावी. त्या भोंग्यावरून दिली जाणारी अजान आपल्याला सहन करण्याची आवश्यकता नाही. आपण या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला भोंगेमुक्त भारत, हा संदेश देऊया. सनबर्न फेस्टिव्हलच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या व्यसनांपासून तरुण-तरुणी यांना रोखले पाहिजे. सनबर्न फेस्टिव्हल पुण्यातूनच नव्हे, तर भारतातून हाकलून लावला पाहिजे. त्याच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या अपप्रकारांची प्रशासनाने योग्य नोंद घेऊन कारवाई करावी.
     सनबर्न हा पाश्‍चात्त्य कार्यक्रम हिंदूंच्या तेजाला भंग करणारा असून तो रहित करण्यात यावा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांनी या वेळी केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn