Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पोलिसांची बहुउद्देशीय काठी !

     सध्या पोलिसांवरील आक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मग त्यात चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने केलेले आक्रमण असो किंवा धर्मांधांनी तलवारीने केलेले आक्रमण असो. अनेक आक्रमणांत पोलीस भीषणरित्या घायाळ होऊन काही वेळा दुर्दैवाने मृत्यूमुखीही पडले आहेत. वर्ष २०१५ मध्ये पोलिसांवर झालेल्या आक्रमणांत ३७० पोलीस घायाळ झाले. आक्रमणांत बळी पडण्यापेक्षा पोलिसांना प्रतिकार करता यावा आणि त्यांचे रक्षण व्हावे, या आत्मीयतेपोटी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने बहुउद्देशीय काठी सिद्ध केली आहे. त्या काठीत जीपीएस् यंत्रणेसह मेटल डिटेक्टर, एल्ईडी दिवे आणि प्रसंगी व्यक्तीला शॉक देण्याची यंत्रणाही बसवण्यात आली आहे. स्वतःच्या सुरक्षेसह गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या काठीचा उपयोग होणार आहे. ‘पोलीस अधिकार्‍यांकडे बंदूक असते; मात्र अनेक पोलिसांच्या हातात केवळ लाकडी काठीच असते. त्या काठीनेच त्यांना गुन्हेगारांचा सामना करावा लागतो; म्हणून ही आगळीवेगळी काठी सिद्ध केली आहे’, हा या काठीमागील उद्देश असल्याचे मत त्या विद्यार्थ्याने व्यक्त केले.
     या काठीविषयी सांगण्यामागील हेतू एवढाच की, पोलिसांच्या जिवाची काळजी एका विद्यार्थ्याला वाटते आणि त्या अनुषंगाने तो कृतीशीलही होतो, ही गोष्ट प्रशासन आणि शासन यांच्यासाठी विचार करायला लावणारी आहे. विद्यार्थ्याला वाटणारी पोलिसांविषयीची संवेदनशीलता जर त्यांना वाटली असती, तर पोलिसांना त्यांच्यावरील आक्रमणांचा प्रतिकार करण्याचे बळ प्राप्त झाले असते. पोलिसांची कर्तव्ये त्यांना चोख पार पाडता यावीत, यासाठी तरी शासन आणि प्रशासन यांची उपाययोजनात्मक पावले तत्परतेने का पडत नाहीत ? आंदोलकांकडून केली जाणारी आंदोलने, दंगलीत धर्मांध घालत असलेला हैदोस, चोरांकडून पोलिसांवरच उगारले जाणारे चाकू, रात्रीच्या वेळी पोलिसांना द्यावा लागणारा पहारा, या समवेतच नागरिकांची घ्यावी लागणारी झडती यांसारख्या अनेक घटनांत ही बहुउद्देशीय काठी पोलिसांना साहाय्यभूत ठरणार आहे. पोलिसांचा विचार करून विद्यार्थ्याने उचललेले हे कृतीशील पाऊल निश्‍चितच अभिंनदनास पात्र आहे. शासन आणि प्रशासन यांनीही या घटनेतून योग्य बोध घ्यावा अन् ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ।’ हे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिसांच्या समर्थनार्थ त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ पुरवावे.
      या समवेतच पोलिसांनीही तंत्रयुगाचा आधार घेत सिद्ध केलेल्या काठीवर सर्वस्वी अवलंबून न रहाता स्वतःचे शारीरिक आणि आध्यात्मिक सामर्थ्यही वाढवणे, ही काळाची आवश्यकता आहे. ते वाढवल्यास आक्रमणांना खंबीरपणे प्रत्युत्तर देत स्वतःसह नागरिकांचेही रक्षण करणे त्याद्वारे शक्य होईल, तसेच गुन्हेगारी न्यून करणेेही शक्य होईल. तेव्हाच खर्‍या अर्थाने जनतेलाही पोलिसांचा आधार वाटू लागेल. ही स्थिती येण्यासाठी हिंदु राष्ट्राची अर्थात् सनातन धर्म राज्याची स्थापना अपरिहार्य आहे !
- सौ. नम्रता दिवेकर, देवद आश्रम, पनवेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn