Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एका संतांनी देहत्याग केल्यानंतर महर्षींनी त्यांना दिलेली आध्यात्मिक शक्ती प.पू. डॉक्टरांना देणे

१. एका संतांनी देहत्याग केल्यानंतर महर्षींनी त्यांना दिलेली
आध्यात्मिक शक्ती प.पू. डॉक्टरांकडे पाठवण्यास आरंभ केल्याने
प.पू. डॉक्टरांना चक्कर आल्यासारखे वाटत आहे, असे महर्षींनी सांगणे
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
    काही दिवसांपूर्वी एका संतांनी देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागानंतर महर्षींनी त्यांना दिलेली आध्यात्मिक शक्ती प.पू. डॉक्टरांकडे पाठवण्यास आरंभ केला; कारण याच संतांकडे पूर्वी एकदा महर्षींनी नाडीवाचन केले होते. त्या वेळी महर्षींनी त्यांना आध्यात्मिक शक्ती दिली होती. आता या आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता अधिकतर प.पू. डॉक्टरांना आहे; कारण प.पू. डॉक्टरांच्या कार्यात या शक्तीचा सहभाग आहे. या शक्तीमुळे जशी त्या संतांना प्रसिद्धी मिळाली, तशीच आता प.पू. डॉक्टरांनाही प्रसिद्धी मिळेल; म्हणून आता आम्ही ही शक्ती अधिक योग्य माणसाकडेच पाठवत आहोत, असे महर्षि म्हणाले.
    या संतांच्या देहत्यागाची वार्ता आली आणि त्याच दिवशी कळले की, प.पू. डॉक्टरांना सारखी चक्कर येत आहे आणि ही चक्कर वाढतच चालली आहे. याचे कारण सांगतांना महर्षि म्हणाले, या संतांनी देहत्याग केल्याने त्यांची आध्यात्मिक शक्ती आता आम्ही परम गुरुजींकडे (प.पू. डॉक्टरांकडे) पाठवत आहोत आणि म्हणून या शक्तीच्या स्पर्शाने त्यांना चक्कर आल्यासारखे होत आहे.
२. प.पू. डॉक्टरांना चक्कर येणे, यातून महर्षींनी अवताराचे कार्य कसे चालते आणि
त्यामागे कोणती घटना दडलेली असते, हे शिकवणे, यासंदर्भातील प.पू. डॉक्टरांचे बोल !
    यावर प.पू. डॉक्टर गमतीने म्हणाले, मला विष्णूचा अवतार म्हणतात, तर एवढी शक्तीही मला सहन होत नाही का ? यावर असे वाटले की, प.पू. डॉक्टरांनी गेली १२ वर्षे सूक्ष्मातून वातावरणातील अनिष्ट शक्तींशी युद्ध केले. त्यात काय काय झाले, ते कुणालाच कळले नाही; परंतु आता स्थूल शक्तीच्या अवतरणाचा काळ चालू झाला आहे. या काळात स्थूल अवताराचे एकप्रकारे शक्तीच्या रूपाने प्रकटीकरणच होत असते. अवताराच्या कार्यात शक्तीच्या देवाणघेवाणीसंदर्भात अनेक घटना घडत असतात. त्यातीलच ही एक घटना म्हणावी लागेल. ही एक भगवंताची कृपाच आहे, असे वाटले. प.पू. डॉक्टरांना त्या कालावधीत चक्कर आल्यासारखे वाटणे, हे एक सनातन धर्म राज्याच्या स्थापनेच्या कार्यातील शक्तीच्या संक्रमित होण्याचे आणि त्यातून भगवंताची कृपा जनसामान्यांना दर्शवण्याचेच एक निमित्त आहे, असे जाणवले.
३. तात्पर्य
    पुढे रामनाथी आश्रमासारख्या ठिकाणीच विश्‍वातील सार्‍या शक्ती एकटवण्यास चालू होईल आणि या शक्तीयोगे सनातन धर्म राज्याचे कार्यही पूर्णत्वास जाईल. प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉक्टरांना म्हणाले होते, सारी तीर्थे रामनाथी येथेच आहेत. तसेच घडले. सारेकाही रामनाथीत प.पू. डॉक्टरांच्या ठिकाणीच गोळा होणार आहे, याचा प्रत्यय या अनुभूतीतून महर्षींनी प्रत्यक्षच आम्हाला दिला.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरूचानुर, आंध्रप्रदेश. (१५.८.२०१६, सायं. ७.५१)
    परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मी अवतार आहे, असे म्हटलेले नाही. सनातनच्या साधकांचा आणि सनातन प्रभातच्या संपादक मंडळाचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही हा लेख प्रसिद्ध करत आहोत. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn