Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

निवृत्त सैनिकाकडून स्थूल असणार्‍या पोलिसांच्या विरोधात याचिका प्रविष्ट !

जे एका माजी सैनिकाला कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?
 त्यासाठी न्यायालयाचा वेळ का घ्यावा लागतो ?
   कोलकाता - एका निवृत्त सैनिकाने स्थूल असणार्‍या पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यात त्यांनी ‘प्रमाणाच्या बाहेर स्थूल असणारे पोलीस कर्मचारी निरोगी नसतात आणि सेवेवर असतांना ते झोपा काढतात’, असा आरोप केला आहे. ‘अशा स्थितीत त्यांच्यावर विसंबून आम्ही आरामात झोपू कसे शकतो ?’, असा प्रश्‍नही विचारला आहे. 
   ही याचिका येथील निमलष्करी दलाचे निवृत्त सैनिक कमल डे यांनी प्रविष्ट केली आहे. या याचिकेला त्यांनी कोलकाता येथील पोट सुटलेल्या १८ पोलिसांची छायाचित्रेही जोडली आहेत. या याचिकेत ते म्हणाले, ‘‘अलीकडे पोलीस कर्मचारी उभे रहाण्याऐवजी आसंदी (खुर्ची) शोधतांना आढळून येतात; कारण ते निरोगी नसतात.’’ यासाठी त्यांनी वर्ष १८६१ मध्ये पोलिसांसाठी बनलेल्या कायद्यातील कलम क्रमांक ७ वर बोेट ठेवले आहे. या कलमानुसार ‘निरोगी नसलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येईल आणि निरोगी होऊन आल्यावरच त्यांना सेवेत घेता येईल’, असे स्पष्टपणे लिहिलेले आहे. या प्रश्‍नाकडे डे यांनी बंगालचे पोलीस महासंचालक आणि कोलकाता पोलीस आयुक्त यांचेही लक्ष वेधले आहे.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn