Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
१. ठळक वैशिष्ट्ये
अ. सप्टेंबर २०१६ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या १० लक्षांहून अधिक झाली.
आ. नवीन चालू केलेल्या तिसर्‍या अ‍ॅड वडर्स खात्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.संकेतस्थळाला भेट देणार्‍यांच्या संख्येत वृद्धी झाली.
इ. सप्टेंबर मासात (महिन्यात) बहुतांश सर्व प्रमुख लेखांना भेट देणार्‍यांच्या संख्येत वृद्धी झाली, उदा. इंग्रजी भाषेतील ग्रहण, श्राद्ध आणि तिसर्‍या महायुद्धाचे भाकित या लेखांना भेट देणार्‍यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली.
२. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
२ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 

२ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
२ आ १. गूगलने दिलेले मानांकन (टीप १) (सप्टेंबर २०१६ नुसार) :
टीप १ : प्रत्येक संकेतस्थळाला गूगल १ ते १० यांपैकी क्रमांक देते. जेवढा क्रमांक जास्त, तेवढे मानांकन (पेज रँक) चांगले.

१ आ २. अलेक्सा क्रमांक (टीप २) (सप्टेंबर २०१६ नुसार) : ५६,३१४
टीप २ : एखाद्या संकेतस्थळाचे अलेक्सा मानांकन जितके अल्प, तेवढे ते संकेतस्थळ अधिक लोकप्रिय समजले जाते. अलेक्सा मानांकन १ लक्षहून अल्प असणे, हे संकेतस्थळ अधिक प्रमाणात लोकप्रिय असल्याचे दर्शक असते.

३. संकेतस्थळावरील लेख
३ अ. नवीन लेख : सप्टेंबर २०१६ मध्ये संकेतस्थळावर २ लेख प्रकाशित करण्यात आले.
१. आर टॅट्यूज गुड फॉर अस ? (अंगावर गोंदवून घेणे योग्य आहे का ?)
२. इज सोशल सर्व्हिस कन्सिडर्ड स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ? (समाजसेवा ही साधना होेऊ शकते का ?) 

३ आ. संकेतस्थळावरील लेखांचे अन्य भाषांमध्ये भाषांतर : सप्टेंबर २०१६ मध्ये विविध भाषांमधील एकूण ६२ लेख संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत. तीन नवीन जिज्ञासूंनी रोमानियन आणि तुर्की या भाषांतील लेखांचे भाषांतर करण्याच्या सेवेला आरंभ केला आहे.

४. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ऑनलाईन प्रसार 
४ अ. सप्टेंबर २०१६ मध्ये फेसबूकद्वारे झालेला प्रसार 


४ अ १. क्षणचित्रे
१. सप्टेंबर २०१६ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्. फेसबूक इंग्रजीचा एंगेजमेंटची (फेसबूक पोस्ट किती लोकांना आवडल्या, शेअर केल्या आणि त्यांच्यावर किती प्रतिक्रिया मिळाल्या ?, यांची) संख्या १ सहस्र २६२ असून ही संख्या मागील मासापेक्षा (महिन्यापेक्षा) ६० टक्क्यांंनी अधिक आहे.
२. सात जिज्ञासूंनी नामजप आणि मीठ-पाण्याचे उपाय यांच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला.

४ अ २. फेसबूकवरील काही यशस्वी पोस्ट्स (इंग्रजी) 

 
४ अ ३. एस्.एस्.आर्.एफ्. भारत फेसबूकद्वारे प्रसार : फेसबूक भारत यांच्या टोटल लाईक्सची संख्या ९ सहस्र ७० इतकी आहे.

४ अ ४. फेसबूकवरील काही यशस्वी पोस्ट्स (इंग्रजी) 


४ आ. गूगल प्लसद्वारे झालेला प्रसार : सप्टेंबर मासात (महिन्यात) गूगल प्लसवरील एकूण दर्शकसंख्या (व्ह्यूज) २ कोटी ३४ लक्ष ७७ सहस्र ४४२ इतकी झाली असून ती मागील मासापेक्षा (महिन्यापेक्षा) ४.६६ टक्यांनी अधिक आहे. मीठ-पाण्याचे उपाय या रशियन भाषेतील चलत्चित्राने १ सहस्र १९ रीच (चलत्चित्र लोकांपर्यंत पोचल्याची संख्या) गाठली आहे.

४ इ. ट्विटरवरील प्रसार : सप्टेंबर मासात (महिन्यात) ट्विटर वरील एंगेजमेंटची संख्या १ लक्ष २४ सहस्र इतकी झाली असून ती मागील मासापेक्षा (महिन्यापेक्षा) ४६ टक्क्यांनी अधिक आहे.

- (पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स, युरोप (ऑक्टोबर २०१६)

(क्रमश: पुढील रविवारी वाचा)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn