Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळ्या पैशाचा भस्मासुर !

निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांची नावे अधिकृत पक्षांच्या सूचीतून वगळली आहेत. या कारवाईनंतर या पक्षांना कोणत्याच निवडणुकीत भाग घेता येणार नाही. निवडणूक लढवता येणार नाही, मग हे पक्ष स्थापनच कशासाठी झाले होते ? देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पंतप्रधानांनी पाऊल उचलले आणि देशातील विविध भ्रष्टाचारी क्षेत्रे उघड झाली. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय पक्ष स्थापनेत होणारा भ्रष्टाचार उघड करण्यात आला. राजकीय पक्षांना देण्यात येणारी आर्थिक देणगी करमुक्त असते. या तरतुदीचा लाभ उठवण्यासाठीच असे काही नाममात्र राजकीय पक्ष स्थापन झाले. करचुकवे, काळा पैसा जमवणारे, राजकारणी, उद्योगपती यांच्याकडून मिळणार्‍या उत्तेजनातून हे राजकीय पक्ष उदयास आले. देशद्रोही कृत्ये करणार्‍यांकडूनच असे केले जाते. याच विचारधारेतून मागे मागे आपण पाहिले, तर त्याला चुकीचे राजकीय धोरण उत्तरदायी असल्याचे लक्षात येते. असे नाममात्र दर्जाचे राजकीय पक्ष स्थापन करण्याची तरतूद असणारे कायदे निर्माण का केले गेले ? शासनानेच ते निर्माण केले म्हणजे शासनानेच भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, असे झाले. या २५५ पक्षांपैकी काही पक्षांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही, तर काही पक्षांनी मागील आठ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्वच दाखवलेले नाही. देशद्रोही कामे करण्यासाठी मात्र यांचा उपयोग केला गेला. शासकीय कारभारातील ढिसाळपणा या पक्षांच्या फोफावण्याला कारणीभूत आहे. पक्ष स्थापन झाल्यावर त्याच्या कारभारावर प्रत्यक्ष कृतीतून लक्ष ठेवणे आवश्यक आहे. संबंधित पक्षाच्या कार्यालयातून उपलब्ध होणार्‍या कागदपत्रांवर अवलंबून राहून कामकाज करणे धोक्याचे ठरते. याचे कारण असे की, अशा व्यक्तींची नीतीमत्ता धर्मशिक्षणाअभावी वादातीत नसते. काँग्रेसी सत्ताकाळात भ्रष्टाचारी कृत्यांवर नियंत्रण नव्हते. आज विविध क्षेत्रांत जो भ्रष्टाचार आणि घोटाळे दिसतात, त्यांची निर्मिती काँग्रेसी काळातील आहे. जनतेला शिक्षणापासून दूर ठेवणे, त्यांना प्राथमिक सुविधाही न पुरवणे आणि त्यांना नेहमी ‘गरजू’ म्हणूनच वावरू देणे, ही धोरणे काँग्रेसी काळात अवलंबली गेली. परिणामस्वरूप एखादी गोष्ट लोकांना दिल्यानंतर लोक शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करू लागले आणि काँग्रेस या सत्तापिपासू पक्षाचे ते मिंधे झाले. बंगालमध्ये जसे साम्यवाद्यांनी ३५ वर्षे राज्य करून राज्यातील हिंदूंना धर्म विसरायला लावले, तसाच प्रकार देशभरातील जनतेच्या संदर्भात काँग्रेसने केला. आज विद्यमान पंतप्रधान भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मागे लागल्यावर मागील काळातील काँग्रेसची पापे दिसू लागली आहेत. नाममात्र राजकीय पक्षांमुळे देशाची आजपर्यंत झालेली हानी म्हणजे ‘काळ्या पैशाचा भस्मासुर’ होय ! 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn