Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ! - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे आजपासून राज्य हिवाळी अधिवेशनास प्रारंभ
       नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने सर्वच प्रश्‍नांवर गांभीर्याने चर्चा केली जाईल. जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. राज्याला पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे, अशी विरोध पक्षालाही विनंती करतो. प्रत्येकच प्रश्‍न राज्यासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न समजून तो सोडवण्यासाठी चर्चा आणि विचारविनीमय सर्व पक्षांकडून करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले...
  • विरोधी पक्ष अजूनही प्रगल्भ झालेला नाही. विरोधकांनी जनतेच्या महत्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा करून निर्णय पदरी पाडून घ्यावेत.
  • राज्य शासन प्रगल्भतेने काम करत आहे. शेतकर्‍यांना विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या रब्बी पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
  • चलनबंदीनंतर शासनाने अनेक योजना राबवल्या. त्या माध्यमातून आम्ही नागरिकांना दिलासा दिला. नोटाबंदीनंतरही सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. मी सर्वसामान्य जनतेचे आभार मानतो की, हा निर्णय देशहितासाठी असल्याने अडचणी असतांनाही सर्वांनी त्रास सहन करून भरघोस पाठिंबा दिला. या माध्यमातून देशात नवी व्यवस्था निर्माण होत आहे.
  • मराठा आरक्षणाच्या संदर्भात अनेक पुरावे गोळा केले असून सरकार उच्च न्यायालयात प्रतिज्ञाप्रज्ञ ५ डिसेंबर या दिवशी दाखल करणार असून सरकारची त्याविषयी भूमिका सकारात्मक आहे.
  • मध्यंतरी अनेक विभाग खरेदीची केंद्रे बनली होती. गेल्या १०-१५ वर्षांपासून केवळ पुरवठादारांनाच लाभ व्हायचा; मात्र लाभार्थी त्यापासून वंचित रहायचे. सरकारने हे थांबवले आहे.
     श्री महालक्ष्मी मंदिर आणि तुळजापूर देवस्थान येथील घोटाळ्यांच्या संदर्भात पत्रकाराने प्रश्‍न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, या संदर्भात चौकशी चालू आहे. अधिक चौकशी करण्यात येईल.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn