Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कुठे चलनी नोटांवर हिंदु शुभचिन्हे छापणारे अन्य देश, तर कुठे नोटांवर तामसिक आकृत्या छापणारा भारत !

इंडोनेशिया मुद्रेवर समृद्धीचे
प्रतीक असणारे श्री गणपतीचे चित्र
१. तामसिक नोटा चलनात 
आणून सर्वत्र तमोगुण पसरवणारे सरकार !
     ‘८.११.२०१६ या दिवशी भारत शासन आणि रिझर्व्ह बँक यांनी चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या सध्याच्या नोटांची वैधता रहित केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने ९.११.२०१६ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात म्हटले आहे, ‘भारतीय चलनी नोटांचे नकलीकरण रोखणे, रोख रकमा साठवून ठेवण्यावर प्रतिबंध आणणे आणि आतंकवादी कारवायांसाठी पैशांचा होत असलेला पुरवठा बंद करणे, यांसाठी सदर पाऊल आवश्यक आहे.’ सरकारने घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. तो कृतीत आणतांना सात्त्विक नोटांचा वापर करून समाजात सात्त्विकतेचा प्रसार करण्याची संधी होती; पण २ सहस्र रुपयांची नवीन नोट तामसिक आहे. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही.
नेदरलॅण्ड या देशात वापरात
असलेल्या चलनावर श्रीरामाचे चित्र
श्रद्धाळू हिंदू चलनी नोटेकडे, म्हणजेच धनाकडे ‘ती लक्ष्मी आहे’, या भावाने पहातात. नोटेवरील विविध आकृतीबंध, चित्रे, चिन्हे आणि नोटेचा रंग, हे घटक सात्त्विक असल्यास तिच्यामध्ये सात्त्विकता निर्माण होते. अशा नोटांमुळे व्यक्तीच्या मनात तिच्याविषयी आपोआपच सात्त्विक भाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नोटा चुरगळणे, नोटांवर पेनने लिहिणे, त्या खराब करणे आदी अयोग्य कृती लोकांकडून होत नाहीत. आध्यात्मिकदृष्ट्या विचार करता एखादी वस्तू जेवढी अधिक सात्त्विक असेल, तेवढ्या अधिक प्रमाणात तिच्यातून चांगली स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात. त्या वस्तूतील सात्त्विकतेचा लाभ वस्तू वापरणार्‍यांना होतो; पण नवीन नोट तामसिक असल्याने तिच्यातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. 
२. भारतीय राज्यकर्ते देवतांची चित्रे आणि शुभचिन्हे असलेल्या 
नोटा वापरणारा नेदरलॅण्ड, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांकडून शिकतील का ?
२ अ. हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीरामाचे चित्र असलेली ‘श्रीराम मुद्रा’ नेदरलॅण्डमध्ये वापरली जाणे : नेदरलॅण्डचे (हॉलंडचे) चलन ‘युरो’ हे आहे. महर्षी महेश योगी यांच्या ‘विश्‍व शांती राष्ट्रा’च्या वतीने ‘एक राम’, ‘पाच राम’, ‘दस राम’ या ३ नोटा असणारी राममुद्रा चलनात आणली आहे. नेदरलॅण्डमधील १०० हून अधिक दुकानांत, ३० गावे आणि अनेक शहरांत हे नवीन चलन वापरात आहे. (संदर्भ : http://news.bbc.co.uk/2/hi/business/2730121.stm
राममुद्रेतील नोटांवर ‘रामराज्य : विश्‍व शांती राष्ट्र’, असे देवनागरी लिपीमध्ये लिहिले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मुद्रेच्या डाव्या बाजूला हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. चित्राच्या दोन्ही बाजूंना हिंदी आणि इंग्रजी या भाषांसह इतर भाषांमध्ये ‘राम’ असे लिहिले आहे. ‘विश्‍व शांती राष्ट्रा’ची स्थापना करण्याच्या संकल्पनेतून ही मुद्रा बनवण्यात आली आहे’, असे सांगण्यात येत आहे. ‘रामराज्य’ हेच शांती आणि सौख्य देणारे असल्याची खात्री नेदरलॅण्डला झाली आणि त्यातून हे चलन स्वीकारण्यात आले’, असे म्हटले जात आहे. परदेशात हिंदूंची संस्कृती आणि देवता यांचा अभ्यास करून त्यांचा उपयोग सामाजिक स्वास्थ्यासाठी कसा केला जात आहे, त्याचे हे एक आदर्श उदाहरण होय.
१. नेदरलॅण्ड या देशात वापरात असलेल्या चलनावर श्रीरामाचे चित्र आहे. 
२. इंडोनेशिया मुद्रेच्या उजव्या बाजूला समृद्धीचे प्रतीक असणार्‍या श्रीगणपतीचे चित्र आहे. 
३. नेपाळमधील नाण्यांवर सूर्य, चंद्र, शंख, गदा, पद्म आणि चक्र ही शुभचिन्हे आहेत.
     कोणत्याही देशाची मुद्रा आणि त्यावरील असणारे विविध आकृतीबंध, चित्रे आणि चिन्हे त्या देशाची संपन्नता दर्शवतात. त्यामुळे मुद्रेवर देवतांची सात्त्विक चित्रे आणि शुभचिन्ह असल्यास अर्थव्यवस्थेत वृद्धी होऊन आदर्श आणि संपन्न होण्यास अधिक साहाय्य होईल.’ 
- कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय 
नेपाळमधील नाण्यांवर सूर्य, चंद्र, शंख, गदा, पद्म आणि चक्र ही शुभचिन्हे
चंद्र, सूर्य, शंख, गदा, पद्म आणि चक्र ही शुभचिन्हे बाजूच्या गोलात मोठी करून दाखवली आहेत
चलनावरील गांधींचे चित्र काढू शकत नसतांना देश काँग्रेसमुक्त कसा करणार ! 
नवीन नोटेवर पुन्हा गांधीच !
     ‘भारत शासनाने, रिझर्व्ह बँकेने ८.११.२०१६ पर्यंत जारी करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची वैधता रहित करून २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या. सामान्य जनतेची पूर्वीपासूनची ‘देशाच्या चलनावर देवतांची किंवा संतांची चित्रे असावीत, ही भावना आहे. भविष्यकाळात असे चलन पहाण्यास मिळेल, अशी अपेक्षाही होती; पण जे व्हायचे तेच झाले. चलनावर नेहमीप्रमाणे गांधीच...!
    देश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा असतांना गांधीचे चित्र काढायला चालढकल का केली जात आहे ? चलनावरून गांधीचे चित्र काढले असते, तर एका दगडात दोन पक्षी मारल्याप्रमाणे, म्हणजे भ्रष्टाचार आणि काँग्रेसमुक्त देशाला आरंभ झाला असता.’
- श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn